एक्स्प्लोर

राष्ट्रीय विज्ञान दिवस : विज्ञानाच्या प्रगतीने 'जग हातात आलं' पण, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं काय?

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्टचा शोध लावला होता. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केलीय. मात्र, त्यातुलनेत वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडं रुजलेला दिसत नाहीये.

मुंबई : संपूर्ण देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (raman effect)शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये "राष्ट्रीय विज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे होय. सर्वच भारतीयांना देशाचे नागरिक म्हणून आपले हक्क माहीत असतात. पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे. आज भारताने विज्ञानात प्रचंड प्रगती केलीय. अंतराळातील मोहिमांमध्ये गणल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा क्रमांक लागतो. या प्रगतीसोबत ज्याप्रमाणात भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला हवा होता त्या प्रमाणात मात्र तो दिसत नाहीय. वैज्ञानिक दृष्टिकोनाचं काय? वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. जो आपल्याकडे होताना दिसत नाही. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झालीय. हातातल्या मोबाईलमध्ये आता सर्व जग सामावलं आहे. सध्या जवळपास सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगती केल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी मनुष्याचं जीवन अधिक सुकर होत आहे. या प्रगतीसोबत जो वैज्ञानिक दृष्टीकोन यायला हवा होता. तो मात्र अजूनही लोकांमध्ये पुरेशा प्रमाणात दिसत नाही. अजूनही अंधश्रद्धेचा पगडा आपल्यावर मोठ्या प्रमाणात असलेला दिसतोय. सी. व्ही. रामन : रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय - सी. व्ही. रामन यांचा तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर 1788 जन्म झाला. रामन यांचे शिक्षण चेन्नई येथे झालं. भौतिक शास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धुळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हा पसरलेला प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच रामन इफेक्ट असे म्हणतात. रामन यांना ब्रिटनमधील राजाने सर ही पदवी बहाल केली. तसेच 1930 साली भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविंद्रनाथ टागोरांनंतर नोबेल पुरस्कार मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. त्यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले. Science Exhibition | विरारच्या उत्कर्ष विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन, 'उडणारे यान आणि चांद्रयान 2' खास आकर्षण
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!

व्हिडीओ

Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
Unknown Car Enter In Delhi Vidhan Sabha: बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
बॅरिकेड तोडून कार घुसवली, पुष्पगच्छ ठेवला अन् गायब झाला; दिल्ली विधानसभेत थरार, PHOTO
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Sangli News: विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
विशाल पाटील पुढचे खासदार नसणार, जीवाचं रान करू!; पडळकरांच्या आव्हानावर खासदारांचं प्रत्युत्तर, 'तुमचं स्वप्न धुळीस मिळेल'!
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Embed widget