एक्स्प्लोर
लाँचिंगपूर्वीच 250000 ग्राहकांची सॅमसंग गॅलक्सी नोट 8 साठी नोंदणी!
अमेझॉन इंडियावर या फोनसाठी आतापर्यंत दीड लाख ग्राहकांनी, तर सॅमसंगच्या वेबसाईटवर एक लाख, अशा एकूण अडीच लाख ग्राहकांनी या फोनसाठी नोंदणी केली आहे.
मुंबई : लाँचिंगपूर्वीच सॅमसंग गॅलक्सी नोट 8 हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. अमेझॉन इंडियावर या फोनसाठी आतापर्यंत दीड लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे. तर सॅमसंगच्या वेबसाईटवर एक लाख, अशा एकूण अडीच लाख ग्राहकांनी या फोनसाठी नोंदणी केल्याचं वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
या फोनसाठी नोंदणी सुरु झाली त्याच्या पहिल्याच दिवशी 72 हजार ग्राहकांनी नोंदणी केली, अशी माहिती कंपनीतील सुत्रांनी आयएएनएसला दिली.
भारतात गॅलक्सी नोट 8 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 12 सप्टेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. याच दिवशी अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस हे दोन फोनही लाँच केले जातील. दिल्लीत दुपारी साडे बारा वाजता गॅलक्सी नोट 8 लाँच केला जाईल. हा कार्यक्रम तुम्ही सॅमसंगच्या वेबसाईटवर लाईव्ह पाहू शकता.
सॅमसंगने गॅलक्सी नोट 8 ची किंमत अमेरिकेत 59 हजार रुपये ठेवली आहे, तर इंग्लंडमध्ये या फोनची किंमत 71 हजार रुपये आहे. मात्र भारतात या फोनची किंमत किती असेल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
गॅलक्सी नोट 8 चे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.1.1 नॉगट
- 6.3 इंच आकाराची एचडी स्क्रीन (Quad HD+ Super AMOLED)
- IP68 वॉटरप्रूफ
- 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा (10X पर्यंत झूम फीचर)
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
- 6GB रॅम आणि 64 GB, 128 GB आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट
- दोन अॅप एकावेळी चालणार
- व्हर्चुअल असिस्टंट Bixby
- 3300mAh क्षमतेची बॅटरी
- फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट
- ब्ल्यूटूथ 5.0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement