एक्स्प्लोर
‘मोटो E3 पॉवर’चा विक्रम, एका दिवसात एक लाख हँडसेट्सची विक्री
नवी दिल्ली : मोटो E3 पॉवर स्मार्टफोन कंपनीने याच आठवड्यात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मोटोरोला इंडियाचे जनरल मॅनेजर अमित बोनी यांच्या माहितीनुसार, मोटो E3 पॉवरच्या एक लाख यूनिट्सची एका दिवसात विक्री झाली.
अमित बोनी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटंलय की, “फ्लिपकार्ट आणि मोटो इंडियाने मिळून नवा विक्रम नोंदवला आहे. एक लाख मोटो E3 पॉवरच्या यूनिट्सची केवळ एका दिवसात विक्री झाली आहे.”
भारतात या स्मार्टफोनची किंमत 7 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन एक्स्क्लुझिव्हली फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. शिवाय, जिओ वेलकम ऑफरलाही सोपर्ट करतो.
मोटो E3 च्या तुलनेत E3 पॉवरची बॅटरी बॅकअप चांगली असून, E3 पॉवरमध्ये 3500mAh क्षमतेची बॅटरी आहे.
मोटो E3 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंचाचा एचडी स्क्रीन (720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन)
- 64 बिट 1GHz मीडियाटेक क्वार्ड-कोर प्रोसेसर
- 1 जीबी आणि 2GB रॅम व्हेरिएंट
- 16 जीबी इंटरनल मेमरी
- 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
- 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमरा
- ड्युअल सिम स्लॉट (मायक्रो)
- 4G LTE
- जीपीएस
- ब्लूटूथ
- वाय-फाय
- यूएसबी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement