एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जागतिक महिला दिन विशेष : भारतातील दर तीन पैकी एका महिलेला अश्लील मेसेज, अनोळखी कॉल्सचा त्रास

जागतिक महिला दिनानिमित्त True Caller या मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीतर्फे एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानूसार भारतातील दर तीन पैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असल्याचे समोर आलं आहे.

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त True Caller या मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीतर्फे  एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानूसार भारतातील दर तीन पैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असल्याचे समोर आलं आहे. मोबाईल क्रमांकाची ऑनलाईन डिरेक्टरी असं स्वरुप असलेल्या True Caller या अॅपचा स्मार्ट फोन युजर्सकडून मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्याकडून 'Understanding Impact of Harassment, Spam Calls & SMS for women' हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालानूसार भारतातील दर तीन पैकी एका महिलेला मोबाईलवर अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. अश्लील मेसेज किंवा अनोळखी कॉल्सचा त्रास होत असलेल्या महिलांपैकी 52 टक्के महिलांना आठवड्यातून एकदा तरी हा त्रास सहन करावा लागतो. यापैकी 74 टक्के कॉल्स अनोळखी व्यक्तीचे असल्याचं समोर आलं आहे. भारताची राजधानी दिल्लीतील 28 टक्के महिलांना दर आठवड्याला त्रासदायक कॉल्स आणि मेसेजचा त्रास होतो असं या अहवालात म्हटलं आहे. तर 53 टक्के महिलांना वैयक्तिक माहिती विचारणा करणारे कॉल्स येत असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. अशा प्रकारे त्रासदायक कॉल्स येणाऱ्या महिलांपैकी 74 टक्के महिला अशा क्रमांकांना ब्लॉक करतात, डीएनडी सेवा अॅक्टिवेट करतात, सोशल मीडियावर याबाबत माहिती पोस्ट करतात किंवा रितसर तक्रार देतात असं देखील या अहवालात म्हटलं आहे. भारतातील 14 प्रमुख शहरांमध्ये 15 ते 35 या वयोगटातील महिलांचं True Caller तर्फे सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला.  'इप्सॉस' या संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. 9 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 2150 महिलांचं सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
Embed widget