एक्स्प्लोर
Advertisement
आज डिजिटल माध्यमांमुळे प्रत्येकाला मोठा उद्योगपती होण्याची संधी : सुरेश प्रभू
अपरिहार्य होणाऱ्या बदलाचा सामना कसा करायचा यावर होणे आवश्यक आहे. याचा फायदा करायचा याबाबत विचार व्हावा. याचा फायदा घेऊन आपण महासत्ता बनू शकतो का याचा विचार व्हावा. डिजिटल क्रांतीमुळे ही संधी प्रत्येक देशाला, राज्याला आणि व्यक्तीला देखील उपलब्ध झाली आहे, असे प्रभू म्हणाले.
मुंबई : आज या प्रत्येकाला जगातील एक मोठा उद्योगपती होण्याची संधी आहे. पूर्वी उद्योगपती होण्यासाठी राजकीय संबंध, भांडवल, मार्केटिंग अशा अनेक गोष्टी कराव्या लागायच्या. मात्र आता याची कशाचीही गरज नाही. आज जवळ काही नसणारे लोक डिजिटल माध्यमाचा वापर करून जगातील पॉवरफुल लोक बनले आहेत. त्या लोकांनी डिजिटल टेक्नॉलॉजी आत्मसात केल्या. आणि त्याचा वापर करून बिझनेस मॉडेल बनवला. म्हणून ही फार मोठी संधी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी केले. ते एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र' उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ब्लॉग माझा स्पर्धेच्या परीक्षक ज्येष्ठ लेखिका प्रज्ञा दया पवार, लेखक आसाराम लोमटे उपस्थित होते.
यावेळी सुरेश प्रभू पुढे म्हणाले की, डिजिटल युग आता अवतरणार आहे. डिजिटल युग हे आलेलं आहे आणि भविष्यात नव्या रुपात येणार देखील आहे. आलेलं जे डिजिटल युग आहे ते हिमनगासारखे आहे. आणि येणारे युग हे कल्पनेपलीकडेही असेल. त्यामुळे अशा काळात असा कार्यक्रम घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी मी एबीपी माझाचे अभिनंदन व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
डिजिटल युगात क्रांती ही विचार करण्यापलीकडे गेली आहे. जगात जे बदल घडत आहेत त्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र वेगळा राहू शकत नाही. टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल घडत आहेत क्रांती होणार आहे त्यात आपण असणार आहोत की नाही, याबाबत कुणीही सांगू शकणार नाही. अपरिहार्य होणाऱ्या बदलाचा सामना कसा करायचा यावर होणे आवश्यक आहे. याचा फायदा करायचा याबाबत विचार व्हावा. याचा फायदा घेऊन आपण महासत्ता बनू शकतो का याचा विचार व्हावा. डिजिटल क्रांतीमुळे ही संधी प्रत्येक देशाला, राज्याला आणि व्यक्तीला देखील उपलब्ध झाली आहे, असे प्रभू म्हणाले.
डिजिटल दुनियेत जन्मलेले सर्व लोक, डिजिटल टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन श्रीमंत झालेले लोक हे अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत. कोरिया हा तंत्रज्ञानामध्ये सर्वात आघाडीचा देश आहे. तिथल्या संशोधकांच्या मते पुढच्या दहा वर्षात आजच्या फॉरचून फाउण्डेड कंपन्या आहेत, त्यापैकी 80 ते 90 टक्के कंपन्या बंद पडणार आहेत. या कंपन्या गेल्यानंतर त्यांच्या जागी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून बिझनेस मोडेल तयार करणाऱ्या कंपन्या येतील. त्यामुळे आता देश, राज्य नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला सुद्धा यात सहभागी होण्याची संधी आहे, असे ते म्हणाले.
पाहा संपूर्ण उद्घाटन सोहळा
महारष्ट्राला आपण पुढारलेलं राज्य म्हणतो. पुढारलेलं असून डिजिटलमध्ये मागे राहिलो तर ते योग्य नाही. आपल्याला डिजिटल माध्यमाचा पूर्णपणे वापर करणे आवश्यक आहे. आज डिजिटलमुळे विवाह जुळत आहेत. यामुळे पालकांची चिंता बऱ्याचअंशी मिटली आहे. घरी पाहुणे आल्यानंतर जेवणाची चिंता करण्याची गरज राहिलेली नाही. घरबसल्या आपण जेवणाची ऑर्डर करू शकते. आरोग्य, शिक्षण, कला आणि अशा अनेक क्षेत्रात अनेक सामाजिक बदल घडले आहेत आणि भविष्यात याहून अधिक बदल घडणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आज क्रांती करण्यासाठी डिजिटल माध्यम अत्यंत महत्वाच आहे. या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. आज तक्रारी तात्काळ घेतल्या जात आहेत. आधी तक्रारी घेतल्या जात नाहीत हीच मोठी तक्रार होती. या बदलांच्या पार्शवभूमीवर खूप काही करण्याची आपल्याला संधी आहे. सामाजिक बदलांना लक्षात घेऊन डिजिटल माध्यमांचा युवकांनी फायदा करून घ्यायला हवा, असे प्रभू यावेळी म्हणाले. असणाऱ्या माहितीचा उपयोग करून डिजिटल माध्यमाचा फायदा कुणीही व्यक्ती घेऊ शकतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एबीपी माझाने आपल्यासमोर पंचपक्वान्न ठेवले आहे. ही मोठी संधी आहे, याचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन देखील प्रभू यांनी केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement