एक्स्प्लोर

Sukesh Chandrasekhar : 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर सिनेमा येणार; नोरा आणि जॅकलीन मुख्य भूमिकेत दिसणार?

Sukesh Chandrasekhar : 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sukesh Chandrasekhar Movie : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हे नाव गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता या सुकेशवर सिनेमा येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आनंद कुमार या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरु आहे. 

सुकेश गेल्या काही महिन्यांपासून अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यात जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव समोर आलं होतं. सुकेश सध्या दिल्लीतील मंडोळी कारागृहात आहे. त्यामुळे त्याच्या आयुष्यावरील सिनेमाचं कथानक लिहिण्यासाठी आनंद कुमार थेट मंडोळी कारागृहात पोहोचले आहेत. मंडोळी कारागृहातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली आहे. 

सुकेश चंद्रशेखरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. या सिनेमात 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंगप्रकरणापर्यंतचा त्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. सुकेश बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीसोबत रिलेशनमध्ये होता. 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलीन आणि नोराचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या सिनेमात जॅकलीन आणि नोराची भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

सुकेश चंद्रशेखर कोण आहे? (Who Is Sukesh Chandrasekhar)

सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुमध्ये राहणारा एक उद्योजक आहे. आजवर अनेकांची फसवणूक केली आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेक गरजू मंडळींची फसवणूक केली आहे. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्याने दाखवलं आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 साली अटक केली आहे. 

सुकेश चंद्रशेखर प्रकरण काय आहे?

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) 200 कोटी रुपयांच्या मनी लॉंडिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेहीची (Nora Fatehi) ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला भेट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलीन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. 

संबंधित बातम्या

Sukesh Chandrasekhar: कोठडीतही सुटेना चैनीचा मोह, महागडी जिन्स आणि चप्पल काढून घेताच ढसाढसा रडला सुकेश चंद्रशेखर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget