एक्स्प्लोर
Pune Railway News : मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसवर टोळक्याकडून दगडफेक; एक प्रवासी जखमी
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. लोणावळ्याजवळ ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
![Pune Railway News : मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसवर टोळक्याकडून दगडफेक; एक प्रवासी जखमी Stone pelting on Sinhagad Express going to Mumbai Pune Railway News : मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसवर टोळक्याकडून दगडफेक; एक प्रवासी जखमी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/18/27b95e5c8761c9d9742fa3087012951a1668752113799442_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
train
Pune News : पुण्याहून (pune) मुंबईला (Pune Crime) जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. लोणावळ्याजवळ ही घटना घडली आहे. या दगडफेकी दरम्यान एका प्रवाशाच्या डोक्याला दगड लागल्याने प्रवासी जखमी झाला आहे. त्या मुलावर रेल्वे स्थानकावर उपचार करण्यात आले आणि सध्या रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
रेल्वे धावत असताना ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक प्रवाशांना जखमी व्हावे लागले आहे. मात्र या घटना अद्यापपर्यंत थांबण्याचे नाव घेत नाहीत. यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. रेल्वे स्थानकावर जखमी प्रवाशावर प्रथमोचार करण्यात आले असून या घटनेबाबत रेल्वे पोलीस तपास करत आहेत. या टोळीने रेल्वेवर दगडफेक का केली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)