एक्स्प्लोर

Rajeshwari-Somnath Wedding : 'गोंधळात टाकू नकोस जब्या...,' शालूसोबतचा नवा फोटो समोर, नेटकरी पुन्हा संभ्रमात

Rajeshwari-Somnath Wedding : शालू आणि जब्याचा पुन्हा एक नवा फोटो समोर आलाय. यामुळे नेटकरी सध्या बरेच संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतंय.

Rajeshwari-Somnath Wedding : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे. फॅण्ड्री सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता सोमनाथ अवघडे (Somnath Awghade) आणि राजेश्वरी खरात (Rajshwari Kharat) या दोघांच्याही लग्नाच्या विधींचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरुवातीला हळदीचे त्यानंतर त्यांच्या लग्नातले असे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच आता शालू आणि जब्याचा पुन्हा एक नवा फोटो समोर आला आहे. 

सोमनाथ आणि राजेश्वरी यांच्या या फोटोमध्ये राजेश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये हिरवा चुडा दिसतोय. त्यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. दरम्यान सोमनाथ आणि राजेश्वरी यांच्या नव्या प्रोजेक्टसाठी हे प्रोमोशन सुरु असल्याचे दावे सध्या सोशल मीडियावर वारंवार होत आहेत. त्यामुळे नेटकरी संभ्रमात असले तरीही हे त्यांच्या नव्या प्रोजेक्टसाठीच असल्याचं म्हणणं नेटकऱ्यांचं आहे. 

नव्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

शालू आणि जब्याच्या या नव्या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय. एका युजरने कमेंट केली आहे की, गोंधळात टाकू नकोस जब्या काय खरं आहे ते सांग की एकदाच. दुसऱ्या युजरने कमेंट करत म्हटलं की, ये जब्या भाई काय खरं ते मॅटर सांगून टाक रे बाबा एकदाच... आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, नवीन प्रोजेक्ट आहे त्यांचा.... आपापल्या काळजाचा तळतळाट करून घेऊ नये.. एका युजरने खरंच यांचं लग्न झालंय की सिनेमाचं शुटींग आहे, असाही प्रश्न विचारलाय. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. 

हा फोटो राजेश्वरी, सोमनाथच्या आगामी प्रोजेक्टचा भाग?

दरम्यान, याआधीही ही जोडी अनेकवेळा एकत्र दिसलेली आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि रिल्स पोस्ट केलेले आहेत. त्यामुळेच या दोघांचा एकमेकांसोबतचा बॉण्ड पाहून त्यांनी लग्न केलंय का? अशी विचारणा त्यांच्या फॅन्सकडून केली जात आहे. खरं म्हणजे हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा एक भाग आहे का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या फोटोमागचा नेमका अर्थ काय? हे लवकरच स्पष्ट होईल...  

View this post on Instagram
 
A post shared by Somnath Laxman Awaghade (@somnath_awaghade)

ही बातमी वाचा : 

Rajeshwari-Somnath Wedding : 'कलवऱ्या नाहीत,ना वऱ्हाडी मंडळी, असं कोणतं लग्न असतं?' जब्या आणि शालूच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे प्रश्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Embed widget