एक्स्प्लोर

Rajeshwari-Somnath Wedding : 'कलवऱ्या नाहीत,ना वऱ्हाडी मंडळी, असं कोणतं लग्न असतं?' जब्या आणि शालूच्या फोटोंवर नेटकऱ्यांचे प्रश्न

Rajeshwari-Somnath Wedding : सध्या सोशल मीडियावर राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यावर अनेकांना बरेच प्रश्न पडलेत.

Rajeshwari-Somnath Wedding : नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित फॅण्ड्री या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले जब्या आणि शालू म्हणजेच अभिनेता सोमनाथ अवघडे (Somnath Awaghade) आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) या दोघांनी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली असल्याच्या चर्चा आहेत. सोशल मीडियावर आधी त्यांच्या हळदीचे आणि त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत. पण यावर त्या दोघांनीही अधिकृत असं कोणतंही भाष्य केलं नाही. त्यामुळे हे त्यांचं खरंच लग्न आहे की कोणत्यातरी सिनेमाचं शुटींग आहे असा प्रश्न नेटकऱ्यांनाही पडलाय. 

राजेश्वरी आणि सोमनाथच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करत याबाबत विचारणा देखील केलीये. म्हणूनच या फोटोंमागचं सत्य नेमकं काय याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. फॅण्ड्री या सिनेमात सोमनाथने जब्या तर राजेश्वरीने शालू ही भूमिका साकारली होती. या भूमिकांमुळे दोघांना बरीच पसंतीही मिळाली. 

शालू आणि जब्याचे फोटो पाहून नेटकऱ्यांना प्रश्न

शालू आणि जब्याने सोशल मीडियावर जे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत, त्यावर अनेकांनी प्रश्न विचारलेत. एकाने कमेंट करत म्हटलं की, राजेश्वरी कोणत्या पिक्चरची शूटिंग चालू आहे. कलवऱ्या नाहीत. वऱ्हाडी मंडळी नाही. त्याच्यामुळे पिक्चर ची शूटिंग वाटते... आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की,अभिनय आहे का खरोखरच, जे काय आहे ते स्पष्ट करा.. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, खोटं -खोटं लग्न आहे, तो मंडप नसून सेट आहे. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं, मागील शुभ विवाह बोर्ड 15-20वर्ष पूर्वी च्या पद्धतीने aahe यावरून स्पष्ट होते कि चित्रपट शूटिंग चालु आहे.. 

हा फोटो राजेश्वरी, सोमनाथच्या आगामी प्रोजेक्टचा भाग?

दरम्यान, याआधीही ही जोडी अनेकवेळा एकत्र दिसलेली आहे. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी आपापल्या इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि रिल्स पोस्ट केलेले आहेत. त्यामुळेच या दोघांचा एकमेकांसोबतचा बॉण्ड पाहून त्यांनी लग्न केलंय का? अशी विचारणा त्यांच्या फॅन्सकडून केली जात आहे. खरं म्हणजे हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टचा एक भाग आहे का? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या फोटोमागचा नेमका अर्थ काय? हे लवकरच स्पष्ट होईल... 

ही बातमी वाचा : 

Rajeshwari-Somnath Wedding : आधी हळदीची चर्चा, आता थेट शेअर केला लग्नाचा फोटो; 'फँड्री' फेम शालू अन् जब्याचं शुभमंगल सावधान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Palghar News : पालघरच्या परनाळी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन ते चार जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
कौन राज ठाकरे, यहा भैय्या का राज चलता है, परप्रांतीयाचा दारू पिवून धुडगूस, अविनाश जाधवांनाही अश्लिल शिवीगाळ
Dharmendra Passed Away: धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
धर्मेंद्र यांचं 89 व्या वर्षी निधन, हेमा मालिनींसह इशा देओल पांढऱ्या कपड्यात पोहोचल्या स्मशानभूमीत
Narendra Maharaj on Hindu: हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
हिंदूंनो किमान दोन मुलं जन्माला घाला, तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्या हिंदू संपेल: नरेंद्र महाराज
Embed widget