एक्स्प्लोर

ऐन कार्तिकीच्या तोंडावर पंढरपुरात झिका व्हायरसचा शिरकाव, मुंबईहून आलेल्या डॉक्टरांना लागण

Zika Virus in Pandharpur: ऐन कार्तिकी एकादशी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Zika Virus Case Found in Pandharpur:  कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी, आता नव्या आजारानं प्रशासनाची चिंता वाढवली आहे. देशात आता झिका व्हायरसनं (Zika Virus) डोकं वर काढलं आहे. पुण्यानंतर (Pune) आता पंढरपुरात  झिका व्हायरसचा (Zika Virus Case) संशयित रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यात एका व्यक्तिला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईवरून एक महिन्यापूर्वी आलेल्या डॉक्टरला पंढरपूरमध्ये पोहचल्यावर त्रास जाणवू लागल्याने पुणे येथे जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  झिका व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. लागण ठ मुंबईत झाली आणि उपचार पुण्यात सुरू आहेत . त्यांची तब्येत आता चांगली असून पंढरपूरमध्ये सगळीकडे तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत  एकही झिका व्हायरस रुग्ण सापडलेला नाही . त्यामुळे यात्रेच्या तोंडावर काहीतरी करून येणाऱ्या लाखो भाविकांनी घाबरण्यात अर्थ नाही. 

मुंबईहून आलेल्या डॉक्टराला झिकाची लागण

येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे सात ते आठ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. यात्रेची तयारी सुरू असतानाच कोल्हापूर, पुणे नंतर पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू आजारात जी लक्षणे दिसून‌ येतात तशीच झिका व्हायरसच्या आजाराची लक्षण आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार असल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ताप येणं, डोकं दुखी  आणि मळमळणे अशी‌ झिका आजाराची प्राथमिक लक्षणं दिसून येतात. 

आरोग्य विभाग अलर्ट मोडवर 

प्रामुख्याने डासांच्या मार्फत हा आजार पसरतो. त्यामुळे जिल्हा हिवताप विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परिसरात  धूळ फवारणी सुरू केली. या शिवाय लोकांमध्ये या आजाराविषयी जनजागृती केली जात आहे. बाधीत परिसरात हिवताप विभागाने कंटेनर सर्व्हे केला असून चार जणांच्या रक्ताचे  नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. याच परिसरातील गरोदर महिलांची तपासणी सुरू केली आहे. पंढरपूर शहरातील मठ, मंदिरे, धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे. 

मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले

आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात आला आहे. कार्तिकी एकादशी ही 23 नोव्हेंबर रोजी आहे.  विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा 65 एकर भक्ती सागर याची पाहणी केली. यावेळी त्यांनी दर्शन रांगेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही वयाची सूचना प्रशासनाला दिल्या. ज्या ठिकाणी दर्शन रांगेजवळ मठ असल्याने तेथून वारकरी जी घुसखोरी करतात त्यासाठी तेथे पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने येथेही हजारो भाविक घुसखोरी करीत असल्याने हे अंतर कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget