एक्स्प्लोर

शिवतीर्थावर आमचाच मेळावा होणार, अद्याप परवानगी न मिळाल्याने दुसरे मैदान बुक: मंत्री शंभूराज देसाई

Shiv Sena Dasara Melava: पाच तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार कंबर कसली असून ही सभा विक्रमी होईल, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

Shiv Sena Dasara Melava: पाच तारखेला होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदार कंबर कसली असून ही सभा विक्रमी होईल, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. अद्याप आम्हाला शिवतीर्थावर सभा घेण्याची परवानगी मिळाली नसली तरी आमचा पहिला हक्क शिवतीर्थावर असणार, असे देसाई यांनी सांगितले. अजून शिवतीर्थाला परवानगी न मिळाल्याने आम्ही पर्यायी व्यवस्था करून ठेवली असली तरी आम्ही शिवाजी पार्क मैदानावरील हक्क सोडला नसल्याचे, देसाई यांनी सांगितले. 

आज शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना कार्यक्रमासाठी आले असता संभूराजे देसाई बोलत होते. ते म्हणाले, परवानगी न घेता दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची भाष्य करणाऱ्यांनी कायदा काय आहे, तेही पाहावं. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. केवळ कौटुंबिक वारसदार म्हणून केवळ आणि केवळ फायदा करून घेण्याचे जे काम करतात त्यांना वारसदार म्हणून या दसरा मेळावयानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांची खरी ताकद कोणाच्या मागे आहे, हे दिसेल, असा थेट इशारा ही त्यांनी दिला आहे. 

माजी मंत्री  रामदास कदम यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाल की, रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य त्यांना आलेल्या अनुभवावरून केलेले आहे. हे ज्यांना रुचले नसेल त्यांनी आंदोलन केले. ते म्हणाले, शिवसेना आमदार कैलास देशमुख यांच्या व्हिडीओ व्हायरल करीनच्या धमकीची खिल्ली उडवताना त्यांनी आमच्यावर बोलल्यावर त्यांना उत्तर देऊ असे सांगितले. तुमचे चुकले नसेल तर चौकशीला का घाबरता आणि गुवाहाटीला तुम्ही काय बोलत होता आणि नंतर काय बोलायला लागला, हे आम्हालाही माहित आहे, असं ते म्हणाले. 

शरद पवार यांना सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल जरा जास्तच प्रेम आले आहे, असा टोला लागवताना गेले अडीच वर्षे सरकार अजित पवार हेच चालवत होते, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीची अवस्था कोल्ह्याला द्राक्षे आंबट, अशी झाली आहे. राष्ट्रवादी हा सत्तेअशिवाय न राहू शकणार पक्ष असून आता सत्ता जाऊन अडीच महिनेच झालेत, तर सत्ता नसल्याने त्यांची तडफड सुरु आहे, असं ते म्हणाले. आजच्या मेळाव्यास जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत , महेश साठे , संजय कोकाटे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर महत्वाची बातमी:

दसरा मेळाव्याला परवानगी मिळो वा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; शिवसेना नेते मिलिंद वैद्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uttam Jankar Baramati : बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार - उत्तम जानकरManoj Jarange on Pankaja Munde : माझ्या वाट्याला जाऊ नका; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवारUttam Jankar : माढ्यात भाजपला धक्का; उत्तम जानकर शरद पवारांसोबतTOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 20  April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
Embed widget