एक्स्प्लोर

Shivsena : दसरा मेळाव्याला परवानगी मिळो वा न मिळो, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; शिवसेना नेते मिलिंद वैद्य

Dasara Melawa : शिवसेनेच्या दसरा मेळव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेचे एका शिष्टमंडळाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

मुंबई: आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार असं शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज करुन महिना झाला तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, आता प्रशासनाने ठरवायचं की परवानगी द्यायची किंवा नाही, आमचा निर्णय ठरला आहे, आम्ही दसरा मेळावा घेणारच असंही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयामध्ये गेलं होतं. त्या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "शिवसेनेने 22  ऑगस्टला दसऱ्या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पहिला अर्ज केला होता. या आधीच्या मेळाव्यासाठी दोन दिवसात परवानगी मिळायची. पण आज आज 20 सप्टेंबर आला तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला दोन वेळा पत्र लिहिलं तर अधिकाऱ्यांची तीन वेळा प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावर विधी खात्याचं मत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्याचं या आधी आम्हाला सांगण्यात आलं होतं. विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने त्यांनी आता कोणतंही उत्तर देणार नाही असं सांगितलं."

मिलिंद वैद्य पुढे म्हणाले की, "शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव आहे. एका वेगळ्या प्रकारचा दबाव महापालिकेवर एक महिन्यांचा वेळ झाला तरी यावर कोणताही निर्णय नाही. दुसऱ्या गटाने बीकेसी साठी परवानगी मागितली होती, त्यांना मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. पण आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचं सांगितलं जातंय. पण त्याचा इथे काही संबंध नाही."

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार 

मिलिंद वैद्य म्हणाले की, "महापालिकेला परवानगी द्यायची असो वा नसो, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार. उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी शिवसैनिक एकत्र जमतील आणि दसरा मेळावा पार पडेल."

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 17 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 16 January 2025Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Kareena Kapoor Khan Social Media Post: नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली,
नवऱ्यावरच्या हल्ल्यानंतर करिनाची पहिली पोस्ट; म्हणाली, "हा आमच्या सुरक्षेसाठी धोका, आम्हाला स्पेस द्या..."
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
Embed widget