सोलापुरात भाजप नेत्यांमध्ये 2 गट, आमदार कल्याणशेट्टींच्या नेतृत्वात भाजप-काँग्रेसचं पॅनेल, तर विरोधात सुभाष देशमुखांचं स्वतंत्र पॅनल
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकात (Solapur Agricultural Produce Market Committee) भाजपच्या नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
Solapur : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकात (Solapur Agricultural Produce Market Committee) भाजपच्या नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी (MLA Sachin Kalyanshetty ) यांच्या नेतृत्वखाली झालेल्या भाजप-काँग्रेस नेत्यांचे पॅनल विरोधात माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनल लढवण्यावर ठाम आहे. भाजपने काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख ( MLA Subhash Deshmukh) स्वपक्षीय नेत्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. मी बाजार समितीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्या. त्यात सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख हे देखील आले होते असे देशमुख म्हणाले.
भाजप काँग्रेस युती कोणाला मान्य नाही
काँग्रेस (Congress) सोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय हे मला माहिती नसल्याचे सुभाष देशमुख ( MLA Subhash Deshmukh) म्हणाले. कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला बोलावले नाही. मी कोअर कमिटीत आहे की नाही हे मला माहिती नाही. पण ज्या अर्थी मला बोलावलं नाही त्या अर्थी की कोअर कमिटीत नसेल असे देशमुख म्हणाले. भाजप काँग्रेस युती कोणाला मान्य नाही पण पार्टीने जिल्हाध्यक्षांना अधिकार दिले असतील तर मला माहिती नाही असे देशमुख म्हणाले.
मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे
भाजप स्थापना दिनाला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले होते की, प्रत्येक स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांसाठी झटा, नेत्यांच्या निवडणुका संपल्यात कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असे सांगितलं होतं असे देशमुक म्हणाले. त्यामुळे प्रदेशाक्षांचे आदेश मानत मी कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढणार आहे असे सुभाष देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी जर काँग्रेस सोबत जायला सांगितले असेल आणि तसा निरोप त्यांनी जिल्हाध्यक्ष यांच्याकडे दिला असेल तर मी तो स्वीकारेन असेही देशमुख म्हणाले. जिल्हाध्यक्षांनी मला सोबत येण्याचे आवाहन केल्याचे मी केवळ बातम्याद्वारेचं पाहिले त्यांनी मला कळवलेलं नाही. पण त्यांनी असे बातम्याद्वारे आवाहन करु नये. मी त्यांचा पालक आहे, असं मी तरी मानतो पण ते मला पालक मानतात की नाही हे मला माहिती नाही असे देसमुख म्हणाले. मी या संदर्भात कोणतीही तक्रार करणार नाही. मी रडणारा नाही, लढणारा कार्यकर्ता आहे असे सुभाष देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:

























