Tanaji Sawant : कोकणातील कुणीतरी येतो आणि... मी जर राज्यात सत्तांतर करू शकतो तर कुणी न बोललेलच बरं; तानाजी सावंत यांचा भरत गोगावलेंना टोला
Solapur: सावंत परिवाराची राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद आहे, मी जर राज्यात सत्तांतर करू शकतो तर इतरांनी न बोललेलच बरं असं म्हणत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भरत गोगावलेंना टोला लगावला.
![Tanaji Sawant : कोकणातील कुणीतरी येतो आणि... मी जर राज्यात सत्तांतर करू शकतो तर कुणी न बोललेलच बरं; तानाजी सावंत यांचा भरत गोगावलेंना टोला tanaji sawant statement on bharat gogawale eknath shinde shivsena internal dispute solapur maharashtra politics marathi news Tanaji Sawant : कोकणातील कुणीतरी येतो आणि... मी जर राज्यात सत्तांतर करू शकतो तर कुणी न बोललेलच बरं; तानाजी सावंत यांचा भरत गोगावलेंना टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/18/88839f8bdc2ff876430087359ce6a8c4170559389596093_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : कोकणातील कुणीतरी येतो आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी निवडीत लक्ष घालतो, उद्या विधानसभेच्या निवडणुकीत यातील एकही निवडून येणार नाही असा सणसणीत टोला आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी नाव न घेता स्वतःच्याच पक्षातल्या आमदार भरत गोगावलेंना (Bharat Gogawale) लगावला आहे.
सोलापुरात शिवसेनेत भुरटे पदाधिकारी नेमले जातात
सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीत तानाजी सावंत यांच्या विरोधी कार्यकर्त्यांना भरत गोगावले यांच्याकडून साथ मिळत असल्याने आज सावंतांनी याचा राग आपल्या भाषणात काढला. जे तालुका पंचायत किंवा ग्रामपंचायतीलाही निवडून येणार नाहीत असे भुरटे पदाधिकारी नेमले जातात, त्यामुळेच मी सोलापूर जिल्ह्यात लक्ष घालत नाही, माझ्यासाठी काम करायला सगळा महाराष्ट्र असल्याचं सांगत तानाजी सावंत यांनी आपल्याच पक्षात सुरू असलेल्या गटबाजीवर संताप व्यक्त केला.
आठ मतदारसंघात सावंतांची ताकद
डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, सावंत परिवार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतो आणि म्हणूनच राज्यातील माढा, सोलापूर, उस्मानाबाद, यवतमाळ, बारामती, पुणे, मावळ, शिरूर अशा आठ लोकसभा मतदारसंघात आपली फार मोठी ताकद आहे. आमची या आठ लोकसभा मतदारसंघात काय ताकद आहे ते लोकसभा निवडणुकीच्यावेळी एप्रिलमध्ये कळेल. मी जर राज्यात सत्तांतर करू शकत असेल तर बाकीचे न बोललेले बरे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)