Solapur News : कर्जाची परतफेड करुनही 7/12 वरील बोजा उतरवला नाही, संतप्त शेतकऱ्याचा सोलापुरात आत्मदहनाचा प्रयत्न
Solapur : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Solapur News : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सावध होत शेतकऱ्याला ताब्यात घेतले अन्यथा मोठी घटना घडली असती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील रहिवासी ज्ञानेश्वर भारत पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करुन देखील सातबारावरील बोजा न उतरवल्याने शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात एकीकडे ध्वजारोहण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळेस ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला रोखत ताब्यात घेतलं.
77 व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) सोहळ्यानिमित्त ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सोहळ्याचा प्रारंभ केला. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केलं. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या कार्यक्रमाचा समारोप झाला. दरम्यान, या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी समाजातल्या विविध स्तरातल्या सुमारे 1 हजार 800 लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलं होतं. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा सोहळा नवी उमेद देत पुन्हा अमृत काळ प्राप्त करून देईल असे केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आले. 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, देशभर स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मंत्रालयात (Mantralaya) ध्वजारोहण सोहळा पार पडला. यानंतर राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. सोबतच यावेळी त्यानी सरकारने जनतेसाठी केलेल्या योजनांची उजळणी केली. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना, एसटीने तिकीटात महिलांना सूट, राज्यातील नागरिकांना मोफत उपचार आणि तपासणीचा निर्णय यासह अनेक योजनांची माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या: