सोलापुरात भर कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमध्ये रंगलं वाकयुद्ध
Subhash Deshmukh VS Vijaykumar Deshmukh: सोलापुरात भाजपच्या (Solapur, BJP) दोन आमदारांमध्ये भर कार्यक्रमांत चक्क वाकयुद्ध रंगले.
![सोलापुरात भर कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमध्ये रंगलं वाकयुद्ध Solapur bjp mla Subhash Deshmukh VS Vijaykumar Deshmukh clash marathi news सोलापुरात भर कार्यक्रमात भाजपच्या दोन आमदारांमध्ये रंगलं वाकयुद्ध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08102220/subhash-deshmukh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Subhash Deshmukh VS Vijaykumar Deshmukh: सोलापुरात भाजपच्या (Solapur, BJP) दोन आमदारांमध्ये भर कार्यक्रमांत चक्क वाकयुद्ध रंगले. सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) आणि विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) या दोन आमदारांमध्ये कार्यक्रमात वाकयुद्ध रंगलं. सोलापुराला (solapur) खेडं असा उल्लेख केल्यामुळे दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध रंगलं. सोलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे व विजयकुमार देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांच्यात सोलापूरच्या खेड्यावरून विवाद झाला.
सोलापुरात भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरच वाकयुद्ध रंगलं. भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात वाकयुद्ध रंगले. "सोलापूर हे मोठे खेडं आहे. याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल. याचा नावलौकिक कसा वाढवता येईल असे विधान आमदार सुभाष देशमुख यांनी केले." मात्र सुभाष देशमुखांनी सोलापूरला 'खेडं' शब्द वापरल्याने भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला. "सुभाष बापू खेडं कां म्हणाले कळले नाही. जिल्ह्यात सोन्याचा धूर निघत होता. येथील चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते. याचा विकास करणे आपली जबाबदारी." असे मत भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.
दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांच्या यांच्या वक्तव्याचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते महेश कोठे यांनी केले. "सोलापूर हे खेडं आहे या आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणण्यात तथ्य आहे." "कारण इथला शिकलेला मुलगा आज बाहेर चालला आहे. तो बाहेर गेला की दोन वर्षात घर घेतो मात्र इथला मनपा कर्मचारी 20 वर्षे घर घेऊ शकत नाही." दरम्यान सत्तेतल्या दोन माजी मंत्र्याच्या या वाकयुद्धाची चर्चा सोलापुरात रंगलेली पाहायला मिळतेय.
सोलापूरच्या विकासाकरता अनेकदा मत मतांतरे समोर येतात. मात्र राज्यातील दोन सत्ताधारी आमदारांत सोलापूर शहराच्या बाबतीत भिन्न प्रतिमा असल्याने सोलापूरकरांनाही या दोन्ही आमदारांच्या भूमिकेचे आश्चर्य व्यक्त होत आहे. सोलापूरच्या विकासाच्या बाताच होतात, प्रत्यक्षाच विकास कधी होणार अशीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. सोलापूर महापालिकेवर भाजपची सत्ता होती, त्याचे प्रमुख नियंत्रण विजयकुमार देशमुख यांच्याकडे होते. सलग दहा वर्षे सत्ता असतानाही सोलापुरात विकास न झाल्याने सोलापूर हे एक मोठ खेडंच राहिले असल्याची बोचरी टीका सुभाष देशमुख करत नाहीत ना? अशी कुजबूज यावेळी उपस्थितांमध्ये होती.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)