(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुप्रिया सुळेंचं दादांच्या दुखऱ्या नसेवर बोट; म्हणाल्या, "शरद पवारांनी 38व्या वर्षी करून दाखवलं ते करून दाखवा"
लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. 38 व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
पुणे: मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) निशाणा साधला आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. 38 व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार साहेबांनी 38 व्या वर्षी जो निर्णय घेतला त्याबद्दल शालिनीताईंनी सविस्तर सांगितलं होतं. पवार साहेब राज्याचे सर्वात युवा मुख्यमंत्री झाले. सगळ्या महत्वाची गोष्ट त्यांना परिवारवादाचे लेबल लागलं नव्हतं. लोकसभेतही विरोधीपक्ष नेते झाले. बारामतीकरांना जो आशिर्वाद दिला त्यासाठी मी त्यांना अभिवादन करते. मी त्यावेळी लहान होते शालिनी पाटील सविस्तर सांगू शकतील.
अजित पवारांना सुप्रिया सुळेंचे ओपन चॅलेंज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह माझे ऐकतात असे अजित पवार म्हणाले यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मोदी- शाहा त्यांचं एकतात असं दादा म्हणाले तसं असेल तर स्वागत आहे. आपले प्रश्न दादांच्या दरबारी आपण मांडू. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी करावी, हमी भाव मिळावा. मराठा, धनगर, लिंगायत मराठा आरक्षणाचा गंभीर आहे त्याचाही आढावा दादांनी घ्यावा तसं झालं तर पवारांना जी संधी 38 व्या वर्षी मिळाली तशी दादांनाही संधी मिळेल.
शरद पवारांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
2024 च्या निवडणुकांपूर्वी abp न्यूज सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आघाड मोठा विजय होणार आहे. लोकशाही आहे जनता ठरवते कोण निवडून येईल, असे सर्व्हेविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवारांवरील टीकेवर बोलताना सु्प्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवारांवर टीका केली तर चर्चा होते.
काय म्हणाले होते अजित पवार?
मी 60 वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला. वसंतदादा देखील चांगलं नेतृत्व होतं, त्यांना देखील बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाचं सरकार आलं. तुम्ही 40 च्या आत निर्णय घेतला, मी तर 60 च्या नंतर निर्णय घेतला. त्यामुळं तुम्ही मला समजून घेतले पाहिजे असे अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा: