एक्स्प्लोर

शिंदे-फडणवीस सरकारने लोकसभा निवडणुकीसाठी पावले उचलण्यास केली सुरुवात, माढा लोकसभेसाठी दिली मोठी भेट

Shinde Fadnavis Government: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Shinde Fadnavis Government: राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी फलटण पंढरपूर रेल्वे आणि दुष्काळी भागाला पाणीपुरवठा योजनेस मदत करण्याची घोषणा केल्याने माढा लोकसभा मतदारसंघ मजबुतीकरणासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. तसा माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीतून शरद पवार आणि नंतर 2014 च्या मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील विजयी झाले होते. नंतर मोहिते पाटील यांनी 2019 निवडणुकीपूर्वी मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभेत दणदणीत विजय मिळवत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला.  

राज्यात 2019 ला लोकशाही आघाडीचे सरकार आले आणि पुन्हा माढा ल्पकासभा मतदारसंघात राष्ट्रवादीने ताकद लावायला सुरुवात केली. यामुळे माढा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी समोरच्या अडचणी वाढू लागल्या होत्या. गेल्यावेळी बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू आणि सध्याचे करमाळा आमदार संजयामामा शिंदे यांनी माढा लोकसभा लढवली होती. शिंदे कुटुंबाच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागल्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर असतानाच राज्यात शिवसेनेत फूट होऊन पुन्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले आणि आता या सरकारने लोकसभा मतदारसंघातील भाजपाची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंढरपूर फलटण या 100 वर्षांपूर्वीच्या नवीन रेल्वेमार्गासाठी 50 टक्के म्हणजे 921 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा फलटण, माळशिरस आणि पंढरपूर भागातील नागरिकांना होणार आहे. राज्याच्या ग्रामीण विशेषत: अविकसीत भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व हे प्रकल्प जलद गतीने पुर्ण व्हावे याकरीता अशा निवडक प्रकल्पांमध्ये 40 ते 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. या रेल्वेमार्ग प्रकल्पाकरिता महाराष्ट्र शासनाने एकूण प्रकल्प किंमतीच्या 50 टक्के खर्च म्हणजेच 1842 कोटीं रुपयांपैकी 921 कोटीं रुपयांच्या आर्थिक सहभागास मान्यता देण्यात आली. राज्य शासनाच्या हिश्श्यामध्ये जमिनीची किंमत शासकीय जमीन अथवा इतर जमीन अंतर्भुत असून हा प्रकल्प महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनी म्हणजेच महारेल द्वारे राबविण्यात येणार आहे.

याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघाला फायदेशीर ठरणारा निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाखांच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला सिंचनास लाभ मिळणार आहे. निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे पुण्यासह, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यातील 43 हजार 50 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील निरा नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सन 2008 पासून धरणामध्ये पूर्णक्षमतेने 339. 39 दलघमी इतका पाणी साठा होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत “उर्वरीत महाराष्ट्र” या प्रदेशात आहे. या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील 6670 हेक्टर, सातारा जिल्हातील अवर्षण प्रवण खंडाळा तालुक्यातील 11860 हेक्टर व फलटण तालुक्यातील 13550 हेक्टर तसेच सोलापूर जिल्हातील माळशिरस तालुक्यातील 10970 हेक्टर असे एकूण 43 हजर 50 हेक्टर क्षेत्रास प्रवाही व उपसा पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयांच्या धडाक्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात शिंदे फडणवीस गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून राष्ट्रवादीसाठी हे निर्णय डोकेदुखी ठरणार आहेत. सध्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा माढा लोकसभा आपल्या ताब्यात घ्यायचा असून त्यांची मदार शिंदे बंधू आणि रामराजे निंबाळकर यांच्यावर अवलंबून आहे. सध्या माढा लोकसभेसाठी भाजपचे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर पुन्हा इच्छुक असून मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांचे नावही चर्चेत येऊ लागले आहे. राष्ट्रवादीकडून फलटण येथील संजीव बाबा निंबाळकर यांच्या नावाची चर्चा असली तरी देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभेवर लक्ष केंद्रित केल्याने माढा लोकसभेत निवडणुकीपूर्वी अजून कोणत्या विकासकांच्या घोषणा होणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget