'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र
Sharad Pawar and Manoj Jarange Patil : पंढरपूर येथे राज्यातील सकल धनगर समाजाकडून आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून यावेळी आंदोलकांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
!['शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र Sharad Pawar is the biggest enemy of Dhangar society in the world Pandurang Mirgal criticism also Slams Manoj Jarange Patil Pandharpur Maharashtra Marathi News 'शरद पवार धनगर समाजाचे जगातील सर्वात मोठे शत्रू'; धनगर नेत्याने डागली तोफ, मनोज जरांगेंवरही टीकास्त्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/09/7a249dc2388d0c3993d544f9357a40fb1725875704289923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला उपोषणाला उठवून बसवले हा आरोप धादांत खोटा असून मी त्यांचा समर्थक नाही. शरद पवार हे धनगर समाजाचे (Dhangar Samaj) जगातील सर्वात मोठे शत्रू आहेत. आमच्या वाटणीचा सोन्याचा डोंगर जो प्रस्थापित व्यवस्थेने पळविला त्यातील धनगर समाजाच्या न्याय हक्काचे सर्वात मोठे दरोडेखोर शरद पवार आहेत, अशी सडकून टीका धनगर समाजाचे नेते पांडुरंग मिरगळ यांनी केली. आजपासून पंढरपूर (Pandharpur News) येथे राज्यातील सकल धनगर समाजाकडून आमरण उपोषणाला सुरुवात होत असून यासाठी पांडुरंग मिरगळ व इतर धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
एबीपी माझाशी संवाद साधताना मिरगळ यांनी सताधारी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर देखील सडकून टीका केली. फाटकी पत्रावळ पळवून नेण्यासाठी मनोज जरांगे यांनी वर्षभर ताकद लावली. आमचे आहे ते लुटून न्यायला लागलाय आणि तुम्ही आम्हाला धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची भाषा करता असल्या भूलथापा द्यायची गरज नसल्याचे म्हणत जरांगे यांच्यावर त्यांनी टीका केली.
पांडुरंग मिरगळ यांची मनोज जरांगेंवर टीका
तुम्ही खूप ताकदवान नेता आहे म्हणता आणि मुख्यमंत्री तुमचा आहे म्हणता तर जा त्या मुख्यमंत्री शिंदे यांना घेऊन या, तुमचा विषय तर लांबचा आहे. आमचा विषय शेकडो वर्षांपासून असून आम्ही आदिवासी आहोत, असे मिरगळ यांनी सांगितले. जरांगे यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली. तुम्ही आधी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये शिरकाव सुरु केला आहे ती मागणी सोडून द्यावी मग आम्ही तुमचे स्वागत करू, अशा शब्दात मनोज जरांगे यांना पांडुरंग मिरगळ धनगर विषयात न बोलण्याची समज दिली.
...तर आम्ही चंद्रभागेत समर्पण करू
राज्यातील सर्वच सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी गेली 78 वर्षे धनगर समाजाचा केवळ वापर करून घेत फसवणूक केली आहे. आता मात्र आर या पारची लढाई आचारसंहितेपूर्वी सुरु केली असून राज्य सरकारने तातडीने एक दिवसाचे अधिवेशन बोलावून धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करावी. अन्यथा सर्वच पक्षांना धनगर समाज आपला धनगरी इंगा दाखवेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता अनुसूचित जमातीत समावेश झाल्याशिवाय आमरण उपोषण थांबणार नसून तशी वेळ आली तर आम्ही चंद्रभागेत समर्पण करू, असा इशाराही सत्ताधारी व विरोधकांना दिला आहे.
पांडुरंग मिरगळ - माऊली हळणवर यांच्यात बाचाबाची
दरम्यान, आज या आमरण उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वीच उपोषणाला बसण्यावरून पांडुरंग मिरगळ व माऊली हळणवर या दोन नेत्यात जोरदार बाचाबाची झाल्याने मिरगळ हे आंदोलनस्थळी सोडून निघून चालले होते. मात्र, इतर समाजातील नेत्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला. यानंतर विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून टिळक स्मारक येथे आमरण उपोषणाला सुरुवात झाली.
आणखी वाचा
Manoj Jarange: मनोज जरांगे पाटलांचा सोशल मिडिया रोहित पवारांकडून मॅनेज; आमदार राऊतांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)