एक्स्प्लोर

Sangola News : शहाजीबापूंच्या मतदारसंघात सगळं काही  NOT OK, विद्यार्थ्यांना काढावी लागतेय पाण्यातून वाट

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न समोर येत आहेत. जुजारपूर येथील ओढ्याला दर पावसाळ्यात भरपूर पाणी येते. या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे.

Sangola News : राज्यातील शिंदे गटाचे स्टार आमदार म्हणून सांगोल्याचे (Sangola) शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गुवाहाटीमधील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या डायलॉगची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर शहाजीबापू पाटील राज्यभर चर्चेत आले होते. दरम्यान, आता शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघातील विविध प्रश्न समोर येत आहेत. तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या जुजारपूर येथील ओढ्याला दर पावसाळ्यात भरपूर पाणी येते. यावर्षी देखील ओढ्याला पूर आला आहे. अशा पाण्यातूनच ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे.

पावसाळ्यात कायम या पुलावरून पाणी वाहते

सांगोला तालुक्यात दक्षिण भागात असलेल्या जुजारपूर येथील ओढ्याला दर पावसाळ्यात भरपूर पाणी येते. पाणी वाहत असल्यानं येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच धोकादायक रीतीने प्रवास करण्याची वेळ आली आहे. या ओढ्यावर सध्याचा असणारा पूल जमीन पातळीलगत असल्याने पावसाळ्यात कायम या पुलावरून पाणी वाहत असते. यामुळे जुजारपूर-जुनोनी या रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागते. याशिवाय दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पाटील वस्ती इथे जाणाऱ्या मार्गावर पुलचं नसल्यानं येथील प्रवास तर जीवघेणा ठरत आहे. या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पावसाळ्याच्या चार महिन्यात या ग्रामस्थांची होणारी अडचण कायमची दूर होणार आहे. मात्र, याबाबत शहाजीबापूंना पाहायला वेळ नसल्याची टीका शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. 

Sangola News : शहाजीबापूंच्या मतदारसंघात सगळं काही  NOT OK, विद्यार्थ्यांना काढावी लागतेय पाण्यातून वाट

 मतदारांच्या प्रश्नाबाबत बापू लक्ष देण्यास तयार नाहीत, लक्ष्मण हाकेंची टीका

विशेष म्हणजे जुजारपूर हे गाव शहाजीबापू पाटील यांच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहिल्याचे दरवेळी मतदानातून दिसत असते. मात्र, आपल्याच मतदारांच्या प्रश्नाबाबत बापू लक्ष देण्यास तयार नसल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सध्याही शाळकरी मुलं आणि ग्रामस्थांना या पाण्यातून जीवघेणा प्रवास करायला लागत असल्याचे हाके म्हणाले.  त्यामुळं शहाजीबापूंनी भाषणबाजी करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रस्नाकडे लक्ष घालावं अशी टीका आता विरोधक करत आहेत.

शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला होता.  शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली होती. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला होता. त्यानंतर शहाजीबापूंनी गुवाहटीचं जे वर्णन केलं ते चांगलचं व्हायरलं झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशातील 'या' बड्या कंपनीत नोकरकपात, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
मोठी बातमी! देशातील 'या' बड्या कंपनीत नोकरकपात, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
Solapur: हृदयद्रावक! पाणी भरलं, मोटरचा प्लग काढण्यासाठी गेली अन् आक्रीत घडलं, विजेच्या झटक्यानं 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक! पाणी भरलं, मोटरचा प्लग काढण्यासाठी गेली अन् आक्रीत घडलं, विजेच्या झटक्यानं 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
Kolhapur Municipal Corporation: पब्लिक फंडाचा गैरवापर एकट्या कंत्राटदारानं केला नाही, गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही फौजदारी करा; कोणी केली मागणी?
पब्लिक फंडाचा गैरवापर एकट्या कंत्राटदारानं केला नाही, गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही फौजदारी करा; कोणी केली मागणी?
आदल्या दिवशीच्या पार्टीला रोहिणी खडसेही होत्या, ते रेव्ह पार्टी नव्हतीच; सुषमा अंधारेंचा महत्त्वाचा दावा
आदल्या दिवशीच्या पार्टीला रोहिणी खडसेही होत्या, ते रेव्ह पार्टी नव्हतीच; सुषमा अंधारेंचा महत्त्वाचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
Raj Thackeray Matoshree:  उद्धव  ठाकरेंना  राज ठाकरेंकडून  वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
Marathi Language Issue | नामांकित शाळेत शाळेतील फलकांवरून नवा वाद! मराठी की English?
Operation Sindoor |ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात ससंदेत विशेष चर्चा
Burnt Currency Notes | वादग्रस्त जाळलेल्या नोटा न्यायाधीश वर्माप्रकरणी सर्वौच्च न्यायालयात उदया सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! देशातील 'या' बड्या कंपनीत नोकरकपात, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
मोठी बातमी! देशातील 'या' बड्या कंपनीत नोकरकपात, 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ
Solapur: हृदयद्रावक! पाणी भरलं, मोटरचा प्लग काढण्यासाठी गेली अन् आक्रीत घडलं, विजेच्या झटक्यानं 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
हृदयद्रावक! पाणी भरलं, मोटरचा प्लग काढण्यासाठी गेली अन् आक्रीत घडलं, विजेच्या झटक्यानं 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
Kolhapur Municipal Corporation: पब्लिक फंडाचा गैरवापर एकट्या कंत्राटदारानं केला नाही, गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही फौजदारी करा; कोणी केली मागणी?
पब्लिक फंडाचा गैरवापर एकट्या कंत्राटदारानं केला नाही, गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांवरही फौजदारी करा; कोणी केली मागणी?
आदल्या दिवशीच्या पार्टीला रोहिणी खडसेही होत्या, ते रेव्ह पार्टी नव्हतीच; सुषमा अंधारेंचा महत्त्वाचा दावा
आदल्या दिवशीच्या पार्टीला रोहिणी खडसेही होत्या, ते रेव्ह पार्टी नव्हतीच; सुषमा अंधारेंचा महत्त्वाचा दावा
Interfaith Marriages : धर्मांतर न करता केलेला आंतरधर्मीय विवाह बेकायदेशीर; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
धर्मांतर न करता केलेला आंतरधर्मीय विवाह बेकायदेशीर; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
बोगस बिल दाखवून 72 लाख लाटल्याचा आरोप, कोल्हापूर मनपाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल, पण ठरलेल्या टक्केवारीचे 1 लाख 20 हजार रोखीनं घेतल्याचा आरोप असलेली महिला अधिकारीच फिर्यादी!
बोगस बिल दाखवून 72 लाख लाटल्याचा आरोप, कोल्हापूर मनपाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल, पण ठरलेल्या टक्केवारीचे 1 लाख 20 हजार रोखीनं घेतल्याचा आरोप असलेली महिला अधिकारीच फिर्यादी!
Pune Crime Rave Party : नवऱ्यावर इतके गंभीर आरोप झालेत, रोहिणी खडसेंनी राजीनामा द्यायला हवा; विरोधकांचा पहिला वार
नवऱ्यावर इतके गंभीर आरोप झालेत, रोहिणी खडसेंनी राजीनामा द्यायला हवा; विरोधकांचा पहिला वार
Chitra Wagh and Rohini Khadse: वाजंत्रीताई विचारायच्या महाराष्ट्रात ड्रग्ज येतात कुठून, आता स्वत:च्याच नवऱ्याला विचारा; रोहिणी खडसेंवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
रोहिणी खडसेंचा पती रेव्ह पार्टीत सापडताच चित्रा वाघ यांचा हल्लाबोल, म्हणाल्या, 'तुमचा नवरा लहान नाही की त्याला...'
Embed widget