Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
नसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कोणालाही अपेक्षा नसताना अचानक वांद्रे येथील मातोश्री निवासस्थान गाठत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वरळीतील मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले होते. मात्र, त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीची चर्चा हवेतच विरुन गेली का, असे वाटू लागले होते. परंतु, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी सर्वांनाच सुखद धक्का देत मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. ठाकरेंच्या गोटात कोणीही तशी अपेक्षा केली नव्हती. मात्र, रविवारी सकाळी राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जायचे, हे ठरवले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊत यांना कॉल लावला. 'मी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे', असे सांगितले. संजय राऊत यांनी ही गोष्ट लगेचच उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानावरुन बाहेर पडले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटांत मातोश्रीवर पोहोचले.
महत्त्वाच्या बातम्या





















