एक्स्प्लोर

Shahaji Patil : सोशल मीडियात ट्रेण्ड होणारे 'शहाजीबापू' कोण? पाहा त्यांची राजकीय कारकीर्द 

शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे.

Shahaji Patil : सध्या महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार संकटात सापडलं आहे. गेल्या सहा दिवसापासून एकनाथ शिंदे जवळपास 40 हून अधिक आमदारांसह गुवाहटीत दाखल झाले आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल चांगलीच झाली आहे. या 40 आमदारांमध्ये  शहाजी पाटील हे देखील आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' अशा प्रकारचं शहाजी पाटील यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हे शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण? त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी आहे, याचा एक आढावा....

शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियात त्यांच्या नावाच सध्या ट्रेण्ड आहे. गुवाहटीत पोहोचलेल्या शहाजीबापू पाटील यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला आणि शहाजीबापूंनी गुवाहटीचं जे वर्णन केलं ते चांगलचं व्हायरलं झालं.
 
शहाजी पाटील नेमकं आहेत तरी कोण?

  • शहाजीबापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार
  • विद्यार्थी दशेपासून शहाजी पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते
  • 1985 साली त्यांनी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली
  • 1985 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा पराभव
  • त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभवच झाला
  • 1995 मध्ये शहाजी पाटील हे 192 मतांनी निवडून आले
  • त्यांनी 1995 ला गणपतराव देशमुख यांचा पराभव केला
  • त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुकीत शहाजीबापूंचा पराभव झाला
  • 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
  • 2019 ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबापू आमदार झाले

अशी आमदार शहाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या बोलण्यात ग्राणीण ढंग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची सातत्यानं चर्चा देखील होत असते. अनेकवेळा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, 2019 मध्ये शहाजी पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतून निवडून आणलं. त्यामुळंच फडणवीस यांच्यासोबत शहाजी पाटील यांची चांगलीच गट्टी आहे. त्यामुळं ते त्यांच्या संभाषणात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे होणार असल्याचे म्हणत आहेत. फडणवीसांचे आणि माझे नाते हे भाव-भावासारखे आहे, तर शिंदेसाहेब मला मुलाच्या नजरेनं बघतात असेही पाटील म्हणालेत.  

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget