निंबाळकर आणि सातपुतेंसाठी खुद्द पंतप्रधान घेणार सभा, 30 एप्रिलला सोलापुरात जंगी सभेचं आयोजन
येत्या 30 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांची सोलापुरात (Solapur) जाहीर सभा होणार आहे. राम सातपुते (Ram Satpute) आणि रणजितसिंह निंबाळकरांसाठी (Ranjeetsingh Nimbalkar) पंतप्रधान सभा घेणार आहेत.
Solapur and Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आलाय. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांसाठी बड्या नेत्यांच्या सभा होत आहेत. काही ठिकाणी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे देखील सभा घेत आहे. येत्या 30 एप्रिलला प्रधानमंत्री मोदी यांची सोलापुरात (Solapur) जाहीर सभा होणार आहे. सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढा लोकसभा (Madha Loksaba) मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांसाठी (Ranjeetsingh Nimbalkar) पंतप्रधान ही सभा घेणार आहेत.
सोलापुरातील मरिआई चौकातील भंडारी मैदानात होणार सभा
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यात आलं आहे. सोलापुरातील मरिआई चौकातील भंडारी मैदानात सभा होण्याची शक्यता आहे. भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूर लोकसभा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी हे 30 एप्रिलला सांगलीची जाहीर सभा घेऊन सोलापुरात येणार आहेत. प्रदेश भाजपाने हा निरोप स्थानिक नेत्यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींच्या सभेमुळं सोलापूरसह माढा आणि धाराशिव लोकसभेसाठी महायुतीला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय. दरम्यान, देशातील मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पार पडणार असून मतदानाचा पहिला टप्पा काल पार पडला आहे. यामध्ये विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झालं आहे. मतदानाचा दुसरा टप्पा 26 एप्रिलला पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी 30 एप्रिलला जाहीर सभा घेणार आहेत.
दोन्ही महत्वपूर्ण लढती, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे मैदानात उतरल्या आहेत. ही तगडी फाईट समजली जात आहे. मागील दोन वेळेस म्हणजे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघात 2019 साली रणजितसिंह निंबाळकर हेच निवडून आले होते. आता त्यांच्यासमोर धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळं आता या दोन्ही मतदारसंघातील जनता कोणाच्या पारड्यात कौल टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
सोलापूर थोडं कठीण, माढा जिंकणं आमच्यासाठी जास्त कठीण; भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या कबुलीनंतर सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली