एक्स्प्लोर

Pandharpur : विठ्ठल मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार, शासनाची मंजुरी

Pandharpur Vitthal Mandir : मंदिर समितीच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत विविध संवर्गातील 225 कर्मचारी कार्यरत असून त्या कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग लागू आहे.

सोलापूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास होण्याऱ्या अतिरिक्त खर्चास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. त्यामुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे . 

आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा मंजुर आकृतीबंधानुसार माहे जानेवारी, 2019 पासून संरक्षित केली आहे. तसेच माहे जून, 2019 पासून सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी लागू केली आहे. मात्र, स्थापनेवरील खर्चास 10% ची मर्यादा असल्याने 50%, 75% व 100% महागाई भत्ता व 5% घरभाडे भत्ता देण्यात येत होता. तथापि, मंदिर समितीने सन 2022–2023 या आर्थिक वर्षापासून आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना 203% महागाई भत्ता व 10% घरभाडे भत्ता लागू केला आहे. मात्र, 3/01/2019 ते 31/03/2024 या कालावधीतील महागाई व घरभाडे भत्त्याच्या फरक दिलेला नव्हता. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देण्याबाबत कर्मचा-यांकडून वारंवार मागणी होत होती.

आषाढी एकादशी दिवशी म्हणजे दिनांक 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी  पंढरपूरला आले असताना  कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळणेबाबत चर्चा करून विनंती केली होती. त्यावर त्यांनी प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावा, शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासित केले होते. त्यानुसार मंदिर समितीच्या सभेत निर्णय घेऊन धर्मादाय आयुक्त यांच्या मंजुरीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दि.20 सप्टेंबर रोजी मंत्रालय येथे व दि.21 सप्टेंबर रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन चर्चा केली होती. त्यास दि. 30 सप्टेंबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे.

मंदिर समितीच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत विविध संवर्गातील 225 कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना सध्या सहावा वेतन आयोग लागू आहे. आता शासनाच्या मंजुरीने 7 वा वेतन आयोग लागू होऊन प्रतिमहा 7 ते 10 हजार इतकी भरघोस वेतनवाढ होणार आहे. त्यासाठी मंदिर समितीचा प्रतिवर्षी एक ते दिड कोटी इतका अतिरिक्त खर्च वाढणार आहे. याशिवाय, दि.03/01/2019 ते दि.31/03/2024 या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगातील भत्त्याच्या फरकाची रक्कम देखील कर्मचा-यांना मिळणार आहे. याबाबत कर्मचा-यांकडून आनंद व्यक्त होत आहे. या कर्मचा-यांच्या सेवा 10 ते 30 वर्षे झालेल्या आहेत असे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

समिती कर्मचाऱ्यांमार्फत श्री. विठ्ठल रूक्मिणीमातेचे पंढरपुरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील 36 परिवार देवता, तसेच पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे यांचे व्यवस्थापन करण्यात येते. यासर्व देवदेवतांची पुजा-अर्चा, नित्योपचार, नैमत्तिक उपचार तसेच वर्षातील 4 उत्सव नियमितपणे पार पाडण्याची जबाबदारी कर्मचा-यांवर आहे. तसेच दर्शनरांग व्यवस्था, अन्नछत्र, गोशाळा, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, चप्पलस्टँड, मोबाईल लॉकर, सुरक्षा व इतर अनुषंगीक अशा विविध प्रकारच्या पुरेसा सोई सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे कर्मचारी सेवाभावाने व वेळेचे बंधन न ठेवता उपरोक्त कामे करीत असतात.

सदर कर्मचाऱ्यांची सेवा संरक्षित होऊन देखील कमी वेतन मिळत असल्यामुळे व वाढत्या महागाईमुळे कर्मचारी आर्थिक विवंचनेत होते. मंदिर समितीने आस्थापनेवरील कर्मचा-यांना गणवेश, ओळखपत्र, सेवा शर्ती लागू करणे, अनुकंपा नियमावली, कर्तव्य सुची निश्चित करून देणे, विमा पॉलीसी अशा प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत येतात.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget