एक्स्प्लोर

Pandharpur : सुमारे 700 वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर पुन्हा अवतरणार, 73 कोटी विकास आराखड्याचे टेंडर फायनल

Pandharpur Vitthal Mandir : मुंबईतील सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याचं काम देण्यात आलं आहे. 

सोलापूर: ज्ञानोबा, तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Mandir) कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली आहे. आता या 73 कोटींच्या विकास आराखड्याच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या टेंडर प्रक्रियेत मुंबई येथील विठ्ठल मंदिराच्या 73 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळालं आहे. 

पहिल्या टप्प्यातील 26 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात कार्तिकी यात्रेनंतर होण्याचे संकेत मंदिर प्रशासनाने दिले आहेत.  पुरातत्व विभागाने दिलेल्या निविदेत आता ठेकेदार निश्चित झाल्याने पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती कामे करायची यासाठी पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि ठेकेदार यांची एक बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

मंदिरातील 700 वर्षांपूर्वीचे मूळ रूप पुन्हा दिसणार

नामदेव महाद्वार, दर्शन व्यवस्था, महालक्ष्मी मंदिरावरील स्लॅब, शनी मंदिराजवळील काम आणि मंदिरातील दगडी फ्लोरिंग या कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात लावलेले ग्रॅनाईट आणि मार्बल हटवून पूर्वीच्या मूळ दगडी भिंती पुन्हा भाविकांना पाहता येणार आहेत. याशिवाय संपूर्ण मंदिराचे फ्लोरिंग हे मूळ दगडी केले जाणार आहे.  

संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या काळात ज्या पद्धतीने विठ्ठल मंदिराचे स्वरूप होते त्याच पद्धतीने आता भाविकांना पाहायला मिळणार आहे. देशातील पुरातन मंदिराप्रमाणे विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप मिळणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असून यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने हा विकास आराखडा तयार केल्याचे औसेकर यांनी सांगितले. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्याची विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73 कोटी 80 लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. तोच आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू करण्यास निधीची तरतूद केल्याने आता विठ्ठलभक्ताना विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे रूप येत्या काळात पाहायला मिळणार आहे. 
       
विठुरायाच्या बाबतीत 'नाही घडविला, नाही बैसविला' ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे.  विठ्ठल मंदिर हे 11 व्या शतकातील असल्याचे अभ्यासक मनात असले तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. आता पुन्हा 700 वर्षापूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा  पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार बनविण्यात आला आहे. या आराखड्याचे पाच टप्प्यात कामे केली जाणार असून यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथे दगडांची झीज झाली आहे अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाणार आहे. याशिवाय मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे.
 
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराच्या आरसीसी काम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. याशिवाय मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्काय वॉक  बनविला जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा , वायरिंग आणि वातानुकूलित यंत्रणा याचे काम केले जाणार आहे.  एका बाजूला विठ्ठल मंदिराचा विकास आराखडा राबविण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असले तरी लाखो विठ्ठल भक्तांची मागणी असलेल्या निवाऱ्यातील दर्शन व्यवस्थेबाबत शासन आणि मंदिर समिती काहीच करीत नसल्याने भाविकांच्या माथी तासंतास मरणप्राय वेदना सोसत दर्शन रांगेतील दर्शन घेणेच नशिबी असणार आहे. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
R. Ashwin : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव जिव्हारी, आर. अश्विन ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? रिपोर्टमध्ये नवा दावा
अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? नेमकं कारण काय? नव्या रिपोर्टमध्ये दावा
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar  : Walmik Karad ला अटक करा, Beed प्रकरणी संदीप क्षीरसागरांनी सभागृह हलवलंABP Majha Headlines :  10 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDCM Eknath Shinde PC FULL : निरपेक्ष काम कसं करावं ते संघाकडून शिकावं - एकनाथ शिंदेGateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
R. Ashwin : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव जिव्हारी, आर. अश्विन ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? रिपोर्टमध्ये नवा दावा
अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? नेमकं कारण काय? नव्या रिपोर्टमध्ये दावा
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये... संतोष देशमुख हत्याप्रकरणावर संदीप क्षीरसागरांच्या भाषणाने विधानसभा हलवून सोडली
वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये... संदीप क्षीरसागरांच्या घणाघाती भाषणाने विधानसभा हलवून सोडली
Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, धक्कादायक गोष्टी उघड; मुका मार बसल्याने अंगातील रक्त साकळलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
Embed widget