Malshiras : तलाठी हरवला, शोधून देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षीस, माळशिरसमधील संगम गावात दवंडी पेटवली
Sangam village Talathi : संगम गावातील तलाठीच गायब असून पूर नुकसानीच्या पंचनाम्याची अनेक कामं त्यामुळे अपूर्ण राहिली आहेत. प्रशासनाच्या कारभाराचा परिणाम हा गावकऱ्यांना भोगावा लागत असल्याचं चित्र आहे.
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी गावात आलाच नाही, किंवा त्याने फोनही सुरू केला नाही म्हणून गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन केल्याचं सोलापुरात पाहायला मिळालं. माळशिरस तालुक्यातील संगम गावातील युवा सेनेने त्यांची शोधमोहीम सुरू केली. तलाठी गायब असून शोधून देणाऱ्यास पाच हजारांचे बक्षीस देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. संगम गावातील या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
पूर नुकसानीच्या पंचनाम्याची कामं अपूर्ण
नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी पंचनाम्याला तलाठी जागेवर नसल्याने माळशिरस तालुक्यातील संगम गावात युवा सेनेच्या वतीने दवंडी देत तलाठ्याला शोधणाऱ्यास पाच हजाराचे बक्षीस जाहीर केले. संगम गावचे तलाठी हे गेले अनेक दिवसापासून गावातही येत नाहीत आणि फोनही सुरू करत नाहीत. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
तलाठी ऑफिसमध्ये येत नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत. म्हणून अखेर आज युवा सेनेच्या वतीने शासनाला जग आणण्यासाठी तलाठी शोधून देणाऱ्यास 5 हजार रुपयाचे बक्षीसही जाहीर केले आहे . महसूल विभागाने तलाठीवर तात्कारळ कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. शिंदे-फडवणीस-पवार सरकारचा या आधिकाऱ्यांवर कसलाही वचक राहिलेला नाही असाही आरोप युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केला आहे.
ही बातमी वाचा :