एक्स्प्लोर

Kartiki Ekadashi : कार्तिकी महापूजेचा पेच आज संपण्याची शक्यता, फडणवीसांच्या हस्ते होणार महापूजा?

Kartiki Ekadashi : जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात आज एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून, यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना मराठा समाज (Maratha Community ) आणि कोळी समाजाचा प्रचंड विरोध होतांना पाहायला मिळत असतानाच, आता हा विरोध मावळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर कार्तिकी महापूजेचा पेच आज संपण्याची शक्यता आहे. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते महापूजा करण्याच्या निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात आज एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून, यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत मराठा आंदोलनाचा पेच सुटेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तसेच, मराठा समाजाबरोबर आदिवासी-कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांना पूजेपासून रोखण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे  कोळी समाज देखील आपल्या समाजाची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहे. एकंदरीत आज दुपारपर्यंत मराठा आणि कोळी समाजाच्या विरोधावर यशस्वी तोडगा निघणार असून, गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी होणारी विठूरायाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचा वारकरी एकत्रित करतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. 

प्रशासनाची महत्वाची भूमिका...

कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याच्या भूमिकेतून मराठा आणि कोळी समाज आक्रमक झालेला असताना, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाने हा प्रश्न अतिशय शांतपणे हाताळले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज दुपारी जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात होणाऱ्या बैठकीत हा वाद संपण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्र्यांना महापूजा करण्यास विरोध होत असतांना मराठा समाजात फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, काल रात्री उशिरा मराठा समाजातील दोन्ही गटांनी एकत्र येत चर्चा केली. तसेच, मराठा समाजाने आपापसातील मतभेद संपवत पुन्हा एकत्रितपणे एकसंघ समाजासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच, गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हे वाद संपले असून, समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या आज दुपारी प्रशासनासमोर होणाऱ्या संभाव्य बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार असल्याचे मराठा बांधवांकडून सांगण्यात आले. 

आजची बैठक महत्वाची...

कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याची भूमिका मराठा आणि कोळी  समाजाने घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही समाजाची आज महत्वाची भूमिका बोलावली आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची बैठक महत्वाची समजली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी महापूजा 'या' उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार? प्रशासनाकडून हालचालींना वेग, आंदोलकांशी चर्चा सुूरू

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget