Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Manohar Mama Bhosale Case Marathi News: स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा सध्या अटकेत आहे.

Manohar Mama Bhosale Case Marathi News: स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama Bhosale) सध्या अटकेत आहे. मनोहर भोसलेवर याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारसारखे 3 गंभीर गुन्हे दाखल होते. आधीच्या 3 गुन्ह्यात जामीनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत आहे. याचदरम्यान आता मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कुर्डूवाडी येथील अंधश्रद्धा व जादूटोणा प्रकरणात दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघांना सहआरोपी करण्यात आले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून रामदास झोळ अजूनही फरार आहेत. (Manohar Mama Bhosale Case)
अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोण्याच्या प्रकरणात एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मोठी कारवाई समोर आली आहे. या गुन्ह्यात दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह आणखी तिघांना सहआरोपी करण्यात आले असून, पोलिसांनी त्यापैकी दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे कुर्डूवाडी व करमाळा परिसरात या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात एप्रिल 2026 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वीच मनोहर ऊर्फ मामा चंद्रकांत भोसले या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, इतरांवरही कायदेशीर कारवाई सुरू आहे. तपासादरम्यान प्रा. रामदास झोळ यांच्यासह राजेंद्र गोपाळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांची नावे समोर आली. पोलिसांनी या गुन्ह्यात राजेंद्र गोपाळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Manohar Mama Bhosale Marathi News)
नागरिकांची फसवणूक करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप- (Manohar Mama Bhosale Case Marathi News)
नागरिकांची फसवणूक करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले आहे. प्रा. रामदास झोळ यांच्याशी संबंधित संस्थेतील कागदपत्रे, रजिस्टर, संगणक आणि इतर साहित्य पोलिसांनी तपासासाठी जप्त केले असून याद्वारे पैशांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. एप्रिल महिन्यात दाखल झालेल्या मूळ गुन्ह्याच्या तपासात नव्याने नावे समोर आल्यामुळे या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, तपासात आणखी काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोंदू मनोहर भोसले याचे पैसे शिक्षण संस्थेत वापरल्याचा संशय पोलिसांना असून यासाठी मायाजवळ यांना अटक केली आहे. मात्र संस्थेचे अध्यक्ष रामदास जवळ अजूनही फरार आहेत.
कोण आहे मनोहर मामा? (Who Is Manohar Mama Bhosale)
- इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी
- डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता
- एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले
- करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
- साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली
- अनेक मोठ्या नेत्यासोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत.
- अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे.
- या आधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
- तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
- 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:





















