एक्स्प्लोर

Instagram Update : जो आवडतो, त्याचीच पोस्ट आधी दिसणार! इंस्टाग्रामने आणले सर्वाधिक मागणी असणारे फिचर!

Instagram Update :  इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमिक फीडवर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नापसंती दर्शवली होती.

Instagram Update :  इंस्टाग्रामचा (Instagram) नवीन फीड पर्याय वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या अकाऊंटमधून किंवा ते फॉलो करत असलेल्या अकाऊंटमधून सर्वात नवी पोस्ट आधी दाखवण्यासाठी मदत करेल. इंस्टाग्राम वापरकर्ते या अॅपवर त्यांचे फीड कसे पाहतात, याच्या अभ्यासानंतर मोठे बदल सादर करत आहे. कारण, कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक मागणी असलेले ‘क्रोनोलॉजिकल फीड’ (Chronological Feed) परत आणण्याचे ठरवले आहे.

मेटा मालकत्व असणारी ही कंपनी आता व्हिडीओ आणि फोटो शेअरिंग सर्व्हिससाठी ‘आवडते आणि फॉलोइंग’ असे दोन नवीन फीड पर्याय सादर करत आहे, जे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या अकाऊंटमधून किंवा ते फॉलो करत असलेल्या अकाऊंटमधून सर्वात नवीन पोस्ट त्वरीत दाखवण्यास मदत करेल.

क्रोनोलॉजिकल फीड ठरेल फायदेशीर!

इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये यूएस सिनेटच्या पॅनेलसमोर माहिती देताना क्रोनोलॉजिकल फीड पर्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांनी हे फिचर लाँच झाले आहे. कंपनीने सुरुवातीच्या काळात वापरकर्त्यांना क्रोनोलॉजिकल फीड ऑफर केले होते. तथापि ते 2016मध्ये अल्गोरिदमिक-चालित फीड बॅकवर स्विच केले गेले. क्रोनोलॉजिकल फीड वापरकर्त्यांना अधिकाधिक नवीन पोस्ट दाखवते. या पोस्ट त्यांनी फॉलो केलेल्या किंवा लाईक केलेल्या अकाऊंटमधून असतात.

इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमिक फीडवर वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नापसंती दर्शवली होती. या फीडमुळे आपण आपल्या आवडत्या पोस्ट पाहू शकत नाही, आणि सतत जुन्या पोस्ट आधी दिसत राहतात, अशी तक्रार वापरकर्त्यांनी केली होती.

नवीन फीड कसे काम करेल?

Instagram वापरकर्त्यांना फीड, लाईक आणि फॉलोइंग असे तीन भिन्न फीड पर्याय ऑफर करण्यास सुरुवात करेल. या वर्षी जानेवारीपासून इंस्टाग्राम फीड बदलांची चाचणी घेत आहे. क्रोनोलॉजिकल फीड हे डीफॉल्ट होम फीड असेल, जे वापरकर्त्यांना शिफारस केलेल्या पोस्टसह ते फॉलो करत असलेल्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ यांचे मिश्रण असेल. इंस्टाग्राम म्हणाले की, ते वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या फीडवर अधिकाधिक पोस्ट आणि रिकमेंडेशन देईल.

इंस्टाग्राम वापरकर्ते या यादीमध्ये 50 खाती जोडू शकतात आणि त्यात कधीही बदल करू शकतात. ‘मोस्ट लाईक’ म्हणून चिन्हांकित केलेल्या खात्यांवरील पोस्ट त्यांच्या होम फीडमध्ये स्टार आयकॉनसह शीर्षस्थानी दर्शवल्या जातील, असे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, फॉलोइंग वापरकर्त्यांना ते फॉलो करत असलेल्या लोकांच्या पोस्ट दाखवल्या जातील. अॅपच्या होम फीडच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात ड्रॉप डाउन मेनूद्वारे कोणीही या फीड्समध्ये प्रवेश करू शकतो. सध्यातरी डीफॉल्ट फीड म्हणून हे क्रोनोलॉजिकल फीड निवडता येईल असे वाटत नाही. तुलनेत, Twitter सध्या वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर डीफॉल्ट फीड म्हणून अल्गोरिदमिक फीड किंवा क्रोनोलॉजिकल फीड निवडण्याची परवानगी देते.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget