Telegram : आता टेलिग्रामवर फाईल्स शोधणे अधिक सोपे होणार, लाईव्ह स्ट्रीमिंगचाही आनंद मिळणार, वाचा कंपनीचे 'हे' नवीन फीचर्स
Telegram : तुम्ही जर टेलिग्राम यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत.
Telegram News Features : इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या श्रेणीमध्ये व्हॉट्सअॅपनंतर (Whatsapp) जर कोणत्याही अॅपची सर्वाधिक चर्चा झाली असेल तर ती म्हणजे टेलिग्राम (Telegram). हे अॅप आपल्या फीचर्समुळे आणि वाढत्या यूजर्समुळे व्हॉट्सअॅपला सतत स्पर्धा देत आहे. शर्यतीत राहण्यासाठी टेलिग्राम सतत अनेक फीचर्स जोडत आहे. या एपिसोडमध्ये टेलिग्रामने एकाच वेळी अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. हे नवीन फीचर्स काय आणि कसे काम करतात जाणून घ्या.
1. डाऊनलोड मॅनेजर :
कंपनीने हे फीचर सर्च बारमधून अनेक लोकांबरोबर आणले आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही टेलिग्रामवर एखादी फाईल डाऊनलोड करता तेव्हा एक सर्च बार उघडेल आणि तो तुम्हाला डाऊनलोड केलेल्या फाईलवर घेऊन जाईल. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणतीही फाईल सहज शोधू शकाल.
2. लाईव्ह स्ट्रीमिंग :
यावेळी टेलिग्रामनेही हे अप्रतिम फीचर आणले आहे. या अंतर्गत, तुम्ही ओबीएस स्टुडिओ आणि एक्सस्प्लिट ब्रॉडकास्टरसारख्या स्ट्रीमिंग टूल्सद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकाल. इतकंच नाही तर तुम्हाला लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये ओव्हरले जोडणं आणि मल्टी स्क्रीन लेआऊट वापरण्याची सुविधाही मिळेल. हे फीचर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये दुसरा आवाज जोडण्याचासुद्धा ऑप्शन देईल.
3. न्यू अटॅचमेंट :
नवीन फीचर्समध्ये ते युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. या अंतर्गत, तुम्ही एकाच वेळी अनेक फाईल्स निवडून एका क्लिकवर पाठवू शकाल. त्याच वेळी, iOS वापरकर्त्यांसाठी ते अधिक खास बनवण्यात आले आहे. अल्बमशी अटॅचमेंट केल्यानंतर त्याचे प्री व्ह्यू सुद्धा दिसेल.
4. नवीन लॉगिन फ्लो :
टेलीग्रामने आता लॉगिन फ्लोची पुनर्रचना केली आहे. हे नवीन फीचर अँड्रॉइड इंटरफेस नाईट मोडमध्ये चालते आणि यामध्ये हलका ट्रान्स्परन्ट इफेक्टसुद्धा दिसतो.
महत्वाच्या बातम्या :
- Samsung Galaxy : सॅमसंगचा सर्वात महागडा फोन 28,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची शेवटची संधी!
- Apple iPhone SE 5G : लाँच झाला सर्वात स्वस्त 5G iPhone, होम बटणचा पर्याय; जाणून घ्या A to Z माहिती
- Samsung Galaxy Book Pro : MacBook ला टक्कर देणारा Samsumg टचस्क्रीन लॅपटॉप, डीलमध्ये 45 टक्के सूट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha