Sindhudurg Submarine Project : राज्यातील बहुचर्चित पाणबुडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील कामाला वेंगुर्ले बंदरात सुरुवात
Sindhudurg Submarine Project : सदर प्रकल्पावरून राज्याच्या राजकारणात वादविवाद आणि हेवेदावे निर्माण होऊन हा प्रकल्प गुजरातला पळवल्याची टीकाही झाली होती.
Sindhudurg Submarine Project सिंधुदुर्ग: राज्यातील बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प (Submarine Project)च्या पहिल्या टप्यातील कामाला वेंगुर्ले बंदरात सुरुवात झाली आहे. वेंगुर्ले बंदर आणि मांडवी खाडीच्या संगमावर बंधारा बांधण्यात येत आहे. याचं बंधाऱ्यावरून पुढे समद्रात जाण्यासाठी बंदर विकसित केलं जाणार आहे. आणि या बंदरातून निवती रॉक येथे होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पासाठी प्रवासी बोटी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणबुडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील बंधाऱ्याच काम सुरू झालं असून याचा फायदा मच्छीमार आणि पर्यटन व्यवसायिकांना होणार आहे.
पाणबुडी प्रकल्पावरून राज्याच्या राजकारणात वाद पेटला होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकल्पावरून टीका केली होती. प्रकल्पासाठी पैसे देऊन देखील तत्कालीन पर्यटन मंत्र्यांनी अडीच वर्षात प्रकल्पाला मंजुरी दिली नाही. यावरून दोन्ही बाजूंनी हेवेदावे देखील करण्यात आले. कोणी हा प्रकल्प गुजरातला पळवला म्हणून दावा केला तर कोणी हा पकल्प होणार असा दावा केला. त्यामुळे कोकणातल्या पर्यटनाला एक वेगळा आयाम देणारा हा बहुचर्चित पाणबुडी प्रकल्पाच्या पहिल्या ट्प्यातील कामाला सध्या तरी सुरवात झाली आहे. ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून त्यानंतर या ठिकाणी प्रवासी जेटी बांधण्यात येणार आहेत. आणि याचं जेटी वरून पाणबुडी प्रकल्पाच्या ठिकाणी निवती रॉक या ठिकाणी प्रवासी बोटी सोडण्यात येणार आहेत. तसेच स्कुबा डायव्हिंग साठी देखील या ठिकाणाहून बोटी सोडण्यात येतील, त्यामुळे खऱ्या अर्थाने वेंगुर्ल्याच्या पर्यटन व्यवसायात मोठी भर पडणार आहे.