Sindhudurg Crime News: आधी नग्न करुन व्हिडीओ बनवला, मग अपहरण करुन संपवलं, कोकणातील दोन वर्षापूर्वीचं हत्याकांड उजेडात
Sindhudurg Crime News: सिंधुदुर्गातील कुडाळमधील चेंदवण गावातील सिद्धिविनायक बिडवलकर या तरुणाचे अपहरण करून खून, मृत्यूच्या अगोदर नग्न करून व्हिडीओ केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कुडाळ, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मार्च 2023 मधील घटना असून आता उघडकीस आली आहे. सिद्धिविनायक बिडवलकर याला चेंदवण गावातील नाईकनगर येथून अपहरण करून कुडाळ मध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नंतर त्यांचा मृतदेह सातार्डा-सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची पोलीस तपासात पुढे आली आहे.
या सर्व प्रकारात चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे. संशयित आरोपी अमोल श्रीरंग शिरसाट याच्या घरात सिद्धिविनायक बिडवलकर यांचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सावंतवाडीतील सातार्डा येथील स्मशानभूमीत सिद्धिविनायक बिडवलकर यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यात आले. सिद्धेश अशोक शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर, सर्वेश भास्कर केरकर आणि अमोल उर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक करून तपास करत आहेत. संतोष देशमुख प्रखरण ताज असताना त्याच प्रकारचे हे प्रखरण समोर आले आहे. अनधिकृत दारू व्यवसायातून पैशांची देवाण घेवाण मधून अपहरण करून खून करण्यात आला.
प्रकाश बिडवलकर याच्या नातेवाईकांमार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे प्रकाशला मार्च 2023 मध्ये पैशाच्या कारणावरुन सिद्धेश अशोक शिरसाट,अमोल श्रीरंग शिरसाट,गणेश कृष्णा नार्वेकर व सर्वेश भास्कर केरकर यांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्तीने कारमधून घेवून गेले होते. त्या दिवसापासून प्रकाश बेपत्ता असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. हा सर्व प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने बेपत्ता प्रकाशचा संशयितांनी घातपात केला असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीकोनातून आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रकाश बिडवलकर याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण (रा. चेंदवण ता कुडाळ) हिच्या तक्रारीवरुन 9 एप्रिल 2025 रोजी प्रकाश बिडवलकर याचे अपहरण झाल्याचा गुन्हा निवती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा आत्ता तपास पूर्ण झाला आहे.























