एक्स्प्लोर

Sindhudurg News : तळकोकणातील वृत्तपत्र विकणाऱ्या तरूणाचा आगळावेगळा छंद; तब्बल 185 देशांची नाणी आणि नोटा एकत्रित करून उभारलं संग्रहालय

Sindhudurg News : तळकोकणातील वृत्तपत्र विकणाऱ्या तरुणाने आतापर्यंत 185 देशांतील नाणी आणि नोटा एकत्रित करून एक आगळावेगळा छंद जोपासला आहे.

Maharahstra Sindhudurg News : माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात आणि हा छंद त्याला एकदा जडला की तो काहीही करू शकतो. असाच एक छंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल मधील युवक ओंकार कदम याने जोपासला आहे. ओंकारला नाणी जमा करण्याचा छंद आहे. हा छंद त्याला लहानपणापासून लागला होता तो आजपर्यंत त्याने जोपासला आहे. हा छंद जोपासण्यासाठी ओंकार घरोघरी जाऊन वृत्तपत्र विकतो. आणि त्यासाठी त्याने आपल्या घरापाठीमागच्या शेतमांगरातील खोलीत एक छोटे संग्रहालय सुरू केले आहे. ज्यामध्ये त्याने तब्बल 185 देशांच्या चलनी नोटा, शिवकालीन नाणी, इ. स. 302 व्या शतकापासून अनेक भारतीय सम्राटांनी आपापल्या काळात चलनात आणलेली नाणी जोपासली आहेत. आणि त्यांचा इतिहासही सुंदर पद्धतीने मांडला आहे. 

ओंकार हा पदवीधर झाला असून त्याचे स्वत:चे किराणा मालाच्या दुकान आहे. आपल्या या व्यवसायाचा व्याप सांभाळत असतानाच ओंकारने आठवीपासूनच नाणी आणि नोटा जमविण्याचा छंद जोपासला आहे. त्याच्या या छंदाचे आज त्याने संग्रहालयात रूपांतर केले आहे.  ओंकारला विविध देशांचे चलन जाणून घेऊन त्यांचा अभ्यास करण्याची खूप आवड आहे. हा अभ्यास करता करता त्याने काही देशांच्या चलनी नोटा आणि नाणी जमवली आहेत. आपल्यासारख्याच आपल्या वयाच्या युवकांना म्हणा किंवा शालेय विद्यार्थ्यांना, आपल्या देशासह विविध देशांच्या चलनांचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने त्याने मोठ्या प्रमाणावर विविध देशांच्या नोटा आणि नाणी जमवण्यास सुरुवात केली. याबरोबरच त्याने इ. स. पूर्व काळामध्ये चलनी नाण्यांचा वापर करणाऱ्या भारतीय राज्यकर्त्यांचा त्यांच्या साम्राज्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. जमा केलेल्या या नोटा, नाणी विद्यार्थ्यांना दाखवता यावीत आणि अभ्यासता यावीत, यासाठी त्याने संग्रहालय सुरु केलं आहे. या संग्रहालयात शिवकालीन नाणी, मोघलकालीन नाणी, एवढेच नव्हे तर ज्या ज्या भारतीय सम्राटांनी या देशावर कित्येक वर्षे राज्य केले, त्या प्रत्येक सम्राटाच्या कारकिर्दितील चलनी नाणी आहेत. शिवछत्रपतींच्या काळातीलही नाणी त्याने जतन केली आहेत.

भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत नोटांवर सह्या करणाऱ्या सर्व गव्हर्नरांच्या स्वाक्षऱ्या असणाऱ्या नोटा, या व्यतिरिक्त जुन्या आणि नव्या अशा वेगवेगळ्या नोटांची बंडल्स, पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतच्या सर्व नोटा या संग्रहालयात उपलब्ध आहेत. नोटा आणि नाण्यांबरोबरच विविध देशांची पोस्ट तिकिटेदेखील त्याने जमविली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व नाणी, नोटांचा लिखित इतिहास त्याने या संग्रहालयात उपलब्ध करून ठेवला आहे. भविष्यात कोकणची संस्कृती आणि कलेचं दर्शन घडविणारं एक मध्यम स्वरुपाचं कला दालन उभारण्याचा ओंकारचा मानस आहे. ओंकारच्या या संग्रहालयाला अनेक पर्यटक भेट देऊन जातात तसेच इतिहासाची माहिती घेऊन जातात. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget