Kirit Somaiya : ठाकरे सरकारनंतर आता किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर ठाकरे परिवार; "ठाकरेंच्या आणखी एका कंपनीची माहिती देणार"
Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर ठाकरे सरकारनंतर आता ठाकरे परिवार आहे.
Kirit Somaiya : ठाकरे सरकारनंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या निशाण्यावर आता ठाकरे कुटुंबीय आहेत. नाशिक दौऱ्यावर निघताना सोमय्यांनी ठाकरे कुटुंबावर टीका केलीय. ठाकरेंच्या आणखी एका कंपनीची माहिती देणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिलाय.
ठाकरेंच्या आणखी एक कंपनीची माहिती देणार
किरीट सोमय्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आज ठाकरेंच्या आणखी एक कंपनीची माहिती देणार आहे. या कंपनीचे मालक उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे आहेत. ठाकरे सरकार हे अलीबाबा चालीस चोर आहे, हे मी सिद्ध करणार, मी अगोदर ठाकरे सरकारची पोलखोल केली. आता ठाकरे परिवाराच्या पोलखोल करण्याची वेळ आलेली आहे. संजय राऊत, भावना गवळी, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक या सर्वांचे घोटाळे बाहेर आले आहेत. ठाकरे सरकार या सर्वांना का विचारत नाही? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या साडे बारा करोड जनतेला या घोटाळ्या संदर्भात भरपूर चीड आहे. आणि आम्ही हे घोटाळे आम्ही बाहेर काढूनच राहणारच असं सोमय्यांनी म्हटलंय.
ठाकरे सरकारने आता हिरवा झेंडा हातात घेतला- सोमय्या
नाशिक दौऱ्यावर निघताना किरीट सोमय्या बोलले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नाशिकला कशासाठी लोक जातात? हिंदू धर्मामध्ये नागरिकांनी ठाकरे सरकारला विसरून जावे, कारण त्यांनी आता हिरवा झेंडा हातात घेतला आहे. हे माफिया सरकार आहे. संजय रावते प्रवक्ते आहेत. असा आरोप सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केलाय.
किरीट सोमय्या आक्रमक, विभास साठेंना सुरक्षा पुरवण्याची मागणी
राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरील कथित रिसॉर्ट प्रकरणी कारवाई सुरू झाल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत सोमय्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले आहे. ईडीने 26 मे रोजी अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापा मारला होता. यामध्ये दापोलीतील रिसॉर्टची कथित विक्री परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान, कार्यालयाचाही समावेश यात होता. किरीट सोमय्या यांनी म्हटले की, राज्याचे मंत्री अनिल परब रिसॉर्ट घोटाळाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे. परब यांनी विभास साठे कडून जमीन घेतली होती. विभास साठे यांचे "मनसुख हिरण" होऊ नये. विभास साठे यांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.