एक्स्प्लोर

Hapus News : बदलत्या वातावरणाचा 'हापूस' ला फटका, किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं हंगामाला उशीर होणार, शेतकरी चिंतेत 

बदलत्या वातावरणाचा (Climate change) आंबा उत्पादक शेतकऱ्यांना (Mango farmers) फटका बसत आहे. त्यामुळं कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Hapus Mango News : सध्या वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. याचा शेती पिकांना मात्र फटका बसत आहे. बदलत्या वातावरणाचा (Climate change) आंबा पिकावर मोटा परिणाम होत आहे. त्यामुळं कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी (Mango farmers) चिंतेत आहेत. कोकणात पडणारा अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये (sindhudurg) आंबा पिकावर तुडतुड्यासारख्या किड रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.

हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने

सतत बदलत असलेल्या वातावरणामुळं फळांचा राजा हापूस आंब्याला फटका बसला आहे. कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस, धुकं आणि सध्या असलेलं ढगाळ वातावरण यामुळं आंब्याचा मोहोर काळवडायला सुरुवात झाली आहे. तुडतुडया सारख्या किडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने होणार आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ  झाली आहे. त्यामुळं फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होणार

दरवर्षी वाशी बाजार समितीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. परतीच्या पावसामुळं झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळं आंब्याची पहिली पेटी जरी वाशी बाजार समितीमध्ये दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु होण्यात अजून अवधी आहे.

परतीच्या पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका

यंदा राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. परतीच्या पावसानं तर धुमाकूळ घातला होता. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक या पावसानं वाया गेली होती. कापूस, सोयाबीन, फळपिके या पिकांना मोठा फटका बसला होता. तर या पावसाच्या फटक्यातून वाचलेल्या पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. दुसरीकडे या पावसाचा आंबा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. यामुळं यंदा आंब्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Mango News : आफ्रिकेतल्या मलावीचा 'हापूस' आंबा APMC मध्ये दाखल, किलोला हजार ते दीड हजार रुपयांचा दर

महत्त्वाच्या बातम्या

Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे वारे, दोन बड्या मंत्र्यांची गच्छंती निश्चित, श्रीकांत शिंदेंना लॉटरी लागणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
Embed widget