एक्स्प्लोर

अखेर दोन महिन्यानंतर 'त्या' विदेशी महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज; पुन्हा धाडलं मायदेशी, नेमकं प्रकरण काय?

Sindhudurg Foreign Woman Update : सिंधुदुर्गच्या जंगलात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या विदेशी महिलेला काल (गुरूवारी) रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Sindhudurg Foreign Woman Update : काही दिवसांपुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात मूळ अमेरिकन महिलेला (Sindhudurg foreign woman) साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. प्रकृती ढासळलेल्या या महिलेला उपचारासाठी गोव्यात बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या प्रकरणात पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. सिंधुदुर्गच्या जंगलात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या विदेशी महिलेला काल (गुरूवारी) रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ती महिला पुन्हा आपल्या मायदेशी परतली आहे, अशी माहिती आहे.

काल (गुरूवारी) या अमेरिकन महिलेला रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरून ती मुंबईला गेली. तिथून अमेरिकेला ती रवाना झाल्याची माहिती आहे. गेल्या 2 महिन्यांपासून ती प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत होती. आता ची महिला ठिक असल्याची माहिती आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातल्या सावंतवाडी (Sawantwadi) येथील जंगलात ही महिला सापडली होती. मानसिक आजारपणातून आपण स्वतःला संपवण्यासाठी जंगलात आपल्या पतीने बांधून ठेवल्याचा बनाव केला होता. पण ऐनवेळी मला जीवन संपवणे चुकीचं असल्याचं वाटलं. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी मी आरडा ओरडा केली. तसेच, माझं लग्नही झालेलं नाही. मी दहा वर्ष तामिळनाडूमध्ये वास्तव्याला होते. केवळ मानसिक आजारपणातून असं टोकाचं पाऊल उचलत बनाव रचल्याचा या महिलेने सांगितलं आहे.या महिलेवरती प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी (Ratnagiri) येथे 2 महिने उपचार सुरू होते. 

पतीने डांबल्याचा रचला बनाव 

जंगलात महिला ओरडत असताना एका गुराख्याच्या हा प्रकार निदर्शनास आला होता. पोलिसांच्या मदतीने ललिता कायी कुमार एस. या अमेरिकन महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयात दाखल केल्यानंतर मला माझ्या पतीने डांबून ठेवले असल्याचा बनाव तिने रचला होता. विशेष म्हणजे बोलता येत नसल्याने तिने बऱ्याच गोष्टी लिहून सांगितल्या होत्या. या महिलेवर दोन महिने उपचार केल्यानंतर आता तिला पुन्हा एकदा आपल्या मायदेशी पाठवण्यात आलं आहे.

महिलेजवळ सापडले होते मोबाईल, टॅब अन् 31 हजार रुपये 

सिंधुदुर्गातील जंगलात सापडलेल्या या महिलेकडे मोबाईल आणि टॅब तसेच 31 हजार रुपये रोख सापडले होते. पोलीस मोबाईच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न केला, त्यातून बरेच धक्कादायक खुलासे झाले होते. अमेरिकन दुतावासाने या प्रकाराची गंभीर दखल होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Meeting Maharashtra : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस; 41 महत्त्वाचे निर्णयABP Majha Headlines :  6 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBopdev Ghat Crime:  बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्णRahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
Embed widget