'जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत', दिपक केसरकरांची नारायण राणेंवर स्तुतीसुमनं
तळकोकणातील राणे केसरकर राजकिय वाद नव्हता तर तो वैचारिक वाद होता असं वक्तव्य राणेंना भेटल्यानंतर दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता पुन्हा दोडामार्ग मध्ये दीपक केसरकरांनी नारायण राणेवर स्तुतीसुमन उधळली आहेत.
सिंधुदुर्ग : मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesakar) पुन्हा एकदा नारायण राणेंवर (Narayan Rane) स्तुतीसुमनं उधळली आहेत. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक भांडण होतं. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत.तसंच राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला, असं वक्तव्य केसरकरांनी केले आहे. तळकोकणातील राणे केसरकर राजकिय वाद नव्हता तर तो वैचारिक वाद होता असं वक्तव्य राणेंना भेटल्यानंतर दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता पुन्हा दोडामार्ग मध्ये दीपक केसरकरांनी नारायण राणेवर स्तुतीसुमन उधळली आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत माझे वैचारिक भाडंण होतं. जे लोक मनाने मोठे असतात ते भांडण फार काळ सुरू ठेवत नाहीत. नारायण राणे आणि मी जिल्ह्यासाठी एकत्र काम करतो. राणेंनी जिल्ह्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री, मंत्री असताना निधी दिला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर स्तुतीसुमन उधळून राजकीय संघर्ष संपून एकत्र आल्याच पुन्हा वक्तव्य केलं आहे.
तिलारी खोऱ्यात पर्यटन वाढीस चालना मिळणार
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीत हजार कोटींचा सुगंधी द्रव्य (परफ्यूम) निर्मिती प्रकल्प येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्र्याच्या हस्ते घोषणा होणार आहे. तर राज्यात कोणताही ग्रीन हायड्रोजन प्रकल्प येत असेल तर तो प्रथम सिंधुदुर्गसाठी द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असे केसरकर म्हणाले. आडाळी एमआयडीसीत एक हजार कोटींचा परफ्यूम निर्मितीचा प्रकल्प येणार आहे. यामुळे भविष्यात येथील युवकांना रोजगारासाठी गोव्याला न जाता तालुक्यातच रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचे केसकरकर म्हणाले. तिलारी धरणाला लिंकरोड मंजूर झाला असून तिलारी खोऱ्यात पर्यटन वाढीस चालना मिळणार असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले.
केसरकर-राणे वादाची पार्श्वभूमी
दीपक केसरकर आणि नारायण राणे हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील बडे नेते. केसरकर आणि राणे हे एकाच जिल्ह्यातील दोन नेते, मात्र दोघांमध्ये टोकाचा संघर्ष.शिवसेनेत असताना दीपक केसरकर यांनी राजकीय दहशतवाद असं म्हणत कायमच राणे यांना लक्ष केलं होतं. गेल्या वर्षीही ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर, अन्य नेत्यांचे वाद मिटले होते, मात्र राणे-केसरकर वाद उफाळून आला होता. राणे केसरकराच्यां पारंपारिक वादात निलेश राणे यांनीही उडी घेत, केसरकरांवर टोकाची टीका केली होती.
हे ही वाचा :