Agriculture News: पेरलेला भात उगवेल का? कोकणातील बळीराजा चिंतेत, पाऊस नसल्यानं शेतीचं कामं खोळंबली
Agriculture News : पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही.
Agriculture News : सध्या राज्यातील बळीराजा पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं खोळंबल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मृग नक्षत्र सुरु आहे. अद्यापही या नक्षत्रात पाऊस झाला नाही. कोकणात (konkan) मृग नक्षत्रात पाऊस सुरु व्हायचा मात्र, अद्याप तिथेही पाऊस झाला नाही. त्यामुळं कोकणातील शेतकऱ्यांची भात शेतीची काम खोळंबली आहेत. तर पेरलेला भात उगवेल का? याची चिंताही शेतकऱ्यांना सतावत आहे.
मृग नक्षत्र संपत आल तरी देखील पावसाची बळीराजाला प्रतिक्षा आहे. अद्याप राज्यात पावसानं हजेरी लावली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कोकणातील बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत मान्सून दाखल झाला खरा पण दिवसातून एखादं दुसरी पावसाची सर कोसळून गेल्या खेरीज पाऊस कुठेही कोसळत नाही. भात पेरणी केली असली तरी कोकणातील शेतकऱ्यांना पेरलेले भात उगवेल का? याची ही चिंता आहे.
सिंधुदुर्गात अंदाजे 4500 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी
कोकणात खरीप हंगामात भात पीक घेतलं जातं. पावसाच्या पाण्यावर भात शेती केली जाते. मात्र, यावर्षी पाऊस लांबल्यानं शेतीची कामे खोळंबली आहेत. सिंधुदुर्गात अंदाजे 4500 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी केली आहे. अजूनही काही ठिकाणी भात पेरणी सुरु आहे. मात्र, पावसाने मृग नक्षत्र कोरडे घालवल्याने बळीराजा चिंतेत आहे.
भात शेती हे कोकणातील शेतकऱ्यांचं प्रमुख पीक
कोकण हा खाच खळग्यांचा भाग असल्यामुळे खाचंरांची शेती म्हणून भात शेतीला ओळखलं जात. पावसाळ्यात कोकणचं प्रमूख पीक हे भात शेती आहे. मात्र पावसाने यावर्षी आत्तापर्यंत मृग नक्षत्र कोरड घालवल्याने बळीराजाला पावसाची प्रतिक्षा आहे. आज ना उद्या पाऊस पडेल या आशेवर कोकणातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
पेरणीचं काम खोळंबली
जून महिन्याचा पंधरवडा उलटला तरी अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे बहुतांशी ठिकाणी पेरण्या (Kharip Sowing) खोळंबल्या आहेत. अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. कृषी विभागाने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. परंतु पाऊस नसल्याने खते, बियाणे पडून असल्याची स्थिती आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करुन नयेत असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: