एक्स्प्लोर

धक्कादायक! पुण्यात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचं रॅश ड्रायव्हिंग, गाडीला जोरात धडक; अपघातानंतर स्वत:ला कोंडून घेतलं

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अख्ख अग्रवाल कुटुंब तुरुंगात असून शिवानी अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

पुणे : शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. पुण्यात रॅश ड्रायव्हिंगमुळं आणखी एक अपघात झाला असून यावेळी चक्क मुख्याधिकाऱ्यांनी एका वाहनाला धडक दिली आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनीच एका वाहनाला मागून ठोकर मारली. मुख्याधिकारी एन के पाटील यांना पोलिसांनी घरी जाऊन ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मुख्याधिकारी पाटील यांनी मद्यपान केलं होतं का? याची पडताळणी करण्यासाठी त्यांचं मेडिकल चेकअप केलं जातं असल्याची माहिती आहे. 

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अख्ख अग्रवाल कुटुंब तुरुंगात असून शिवानी अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस तपासात अग्रवाल पती-पत्नीने ब्लड सॅम्पल हेराफेरीतील सहभागावर भाष्य केलं आहे. त्यामुळे, हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत असून आता पुण्यातून आणखी एका अपघाताची माहिती समोर आली आहे.  पुण्यातील तळेगावमध्ये आज दुपारी हा अपघात झाला. मुख्याधिकारी पाटील हे स्वतःच त्यांची खासगी गाडी चालवत होते, त्यावेळीच अपघात झाला असल्याची माहिती समोर येत होते. सुसाट वेगात निघालेल्या एन. के. पाटलांनी समोरच्या चारचाकीला जोराची धडक दिली, ही ठोकर इतकी जोराची होती की, धडक दिलेल्या वाहनाची त्यापुढच्या वाहनाला धडक बसली. यात दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणाला ही इजा पोहचली नाही. मात्र, अपघातानंतर मुख्याधिकारी स्वतःच्या घरी निघून गेले अन् स्वतःला घरात आतून कोंडून घेतलं. 

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस काही वेळातच मुख्याधिकारी पाटील यांच्या घरी पोहोचले. पोलिस पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, त्यामुळे पाटलांनी आतून दार उघडलंच नाही. मात्र, पोलीस जात नसल्याचं लक्षात आल्यावर शेवटी पाटलांनी दार उघडलं. मग, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आता, पाटील यांची वैद्यकीय तपासणी केली जातं आहे. दरम्यान, पाटील यांनी मद्यपान करुन गाडी चालवली का ह्याबाबतची माहिती वैद्यकीय तपासणीनंतरच समोर येईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Andheri Melava | ठिणगी पडली, पाणी टाकलं, ठाकरेंच्या मेळाव्यात स्टेजवर काय घडलं?Sharad Pawar Speech Kolhapur:बोलताना धाप,मध्ये-मध्ये खोकला,व्हाईट आर्मीच्या कार्यक्रमात पवारांचे धडेRatnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP MajhaCity 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
Embed widget