एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'भाजप नेत्यांची बेताल वक्तव्य, चर्चेत काय अर्थ?', शिवसेना नेत्यांचा सवाल
मुंबई: शिवसेना भाजप युतीच्या चर्चेत सहभागी होणाऱ्या शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. युतीची चर्चा सुरु असताना काही भाजपचे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे चर्चा करण्यात अर्थ काय? असा सवाल शिवसेना नेत्यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांचा या नेत्यांवर वचक आहे? याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणीही शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील वाद चिघळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनीही बेताळ नेत्यांना आवर घालावा असं भाजपला आवाहन केलं होतं. 'युती जर करायची तर संपूर्ण महाराष्ट्रात करायची. जिल्हा परिषदा, पंचायत समिता आणि 10 महापालिकेत युती व्हावी असा उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. आतापर्यंत युतीच्या बैठकीचे दोन राऊंड झाले. मात्र, त्यातून फार काही निष्पन्न झालं नाही.’ अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली.
‘युतीच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षातून प्रतिनिधी नेमलेले असताना काही जण बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आवर घालणं हे त्या-त्या पक्षाचं काम आहे. नाहीतर युतीच्या चर्चेत व्यत्यय येईल. तसं झालं तर, पुढे काय होईल हे सर्वांना ज्ञात आहे.’ असं म्हणत अनिल देसाई यांनी किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे.
संबंधित बातम्या:
VIDEO: 'बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना आवरा', अनिल देसाईंचा भाजपला इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement