Nanded Crime : शालेय साहित्य घ्यायला पैसे नाहीत, मुलाची आत्महत्या, पाठोपाठ कर्जबाजारी शेतकरी बापानंही जीवन संपवलं
Nanded Crime : आर्थिक अडचणींमुळे शेतकरी पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
Nanded Crime : सततच्या नापिकीने आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पिता पुत्राने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे घडली आहे. अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय 43) व ओमकार राजेंद्र पैलवार (16) असे आत्महत्या केलेल्या मृत पिता-पुत्राचे नावे आहेत.
नापिकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पिता-पुत्राची आत्महत्या
अधिकची माहिती अशी की, कर्जबाजारीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या मिनकी येथील शेतकरी पिता-पुत्राने 9 जानेवारीला सकाळी नऊ वाजता स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र लक्ष्मण पैलवार (वय 43) व ओमकार राजेंद्र पैलवार (19) असे मृत पिता-पुत्राचे नावे आहेत.
सततची नापिकी, 2 एकर जमिनीवर 4 लाखांचं कर्ज
बिलोली तालुक्यातील मिनकी येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांना दोन एकर जमीन आहे. त्या शेतावर चार लाखांचे कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक (खतगाव) या शाखेकडून घेतले होते. शेतावरील कर्ज व सततची होत असलेली नापिकी, यामुळे मुलाच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा याची चिंता होती. याबाबत सतत घरात आर्थिक ताणतणाव असायचा. त्यांचा मुलगा ओमकार हा उदगीर येथे शिक्षणास होता.
शेतकरी पिता-पुत्रानं गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
मुलगा ओमकार हा संक्रांतीनिमित्त गावाकडे आला होता. त्याने 8 जानेवारीला वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्य तसेच नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पैशांची मागणी केली. परंतु वडिलांनी त्यांना पैसे नाहीत, थोडे दिवस थांब, नंतर घेऊन देतो, असे सांगितले. त्यामुळे मुलगा नाराज झाला. वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने बुधवारी रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरी नसल्याचे पाहून वडील राजेंद्र पैलवार गुरुवारी सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले. तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहताच वडिलांनीसुद्धा मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेऊन स्वतः ची जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Video: वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर