एक्स्प्लोर

Satara Loksabha : सातारमध्ये दोन शिंदेंमध्ये आरोपांच्या फैरी रंगल्या; आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, तर मी अर्ज भरणार नाही!

महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर शशिकांत शिंदे यांनी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 

सातारा : सातारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित होताच आता आरोपांच्या फैरी सुद्धा रंगू लागल्या आहेत. साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी महविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महेश शिंदे यांनी नवी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

रडीचा डाव केला जात आहे

महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, महविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर उद्या (15 एप्रिल) मी शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहे. लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रडीचा डाव केला जात आहे. मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे. जर यामध्ये मी दोषी आढळलो, तर मी माझा उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा का नाही?

दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसल्याने खोचक शब्दामध्ये टीका केली आहे. ते म्हणाले की, छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावयाचा होता, तर भाजपने त्यांचे नाव जाहीर करावयास इतका वेळ का लावला आहे? त्यांनीच हा प्रश्न त्यांच्या मनाला विचारावा मी छत्रपतींच्या गादीबद्दल बोलणार नाही, माझे उदयनराजे किंवा इतर लोकांशी वैचारिक वाद नाही छत्रपतींच्या गादीच्या सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्यांनी छत्रपतींच्या गादीचा किती सन्मान ठेवला? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी केला. 

भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी मुंबईत साताऱ्याच्या गादीचा सन्मान ठेवून उदयनराजे भोसले यांना बिनविरोध करावे, असे आवाहन केले होते. यानंतर शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, मागील वेळी ते राष्ट्रवादी असताना त्यांचा प्रचार करण्यासाठी मीच आघाडीवर होतो. आत्ताची लढाई महाराष्ट्र आणि साताऱ्याच्या स्वाभिमानाची आहे. त्या आणि आताच्या काळात फरक एवढाच आहे की आताच्या काळात लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाची लढाई आहे. सातारा जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा, याची लढाई आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Accident News: गणपतीपुळ्याला फिरायला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला! भरधाव कार कराडजवळ 2-3 वेळा उलटली अन्...; एकाचा मृत्यू, दोन जखमी
गणपतीपुळ्याला फिरायला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला! भरधाव कार कराडजवळ 2-3 वेळा उलटली अन्...; एकाचा मृत्यू, दोन जखमी
साताऱ्यात खलबत! काल महायुतीच्या बैठकीला उपस्थिती, आज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात नेमकं काय?
साताऱ्यात खलबत! काल महायुतीच्या बैठकीला उपस्थिती, आज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी, शरद पवार गटाच्या आमदारांच्या मनात नेमकं काय?
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शंभुराज देसाईंची खदखद; म्हणाले, आमची अवस्था येऊ नको तर कोणत्या डब्यात बसू
धक्कादायक! आजोबांच्या डोळ्यासमोरच नातवाचा अंत, कोयना नदीत बुडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! आजोबांच्या डोळ्यासमोरच नातवाचा अंत, कोयना नदीत बुडून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Pandharpur Pick Up Accident: पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा; पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा करुण अंत, दैव बलवत्तर असल्याने 6 जणांचा जीव वाचला
पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा; पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा करुण अंत, दैव बलवत्तर असल्याने 6 जणांचा जीव वाचला
Pandharpur Accident News : महाराष्ट्र हादरला! देवाचं दर्शन घेऊन निघालेल्या 8 भाविकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? हादरवून सोडणारे Photos
महाराष्ट्र हादरला! देवाचं दर्शन घेऊन निघालेल्या 8 भाविकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? हादरवून सोडणारे Photos
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2026 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2026 | रविवार 
Nitish Kumar Reddy Viral Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Video: मॅच संपताच आईचा फोन आला अन् नितीश रेड्डीनं पत्रकार परिषद थांबवली! बीसीसीआयच्या कॅप्शनने सुद्धा लक्ष वेधलं
Embed widget