Satara Crime : साताऱ्यात तलावात उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या; दोघांचाही मृतदेह सापडला, आत्महत्येचं कारण अस्पष्ट
अक्षय आणि गौरी या दोघांनी रविवारी तलावात उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने दाखल झाले.
सातारा : सातारा तालुक्यातील (Satara News) कोंडवेत प्रेमीयुगुलाने तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणीचा मृतदेह रविवारी रात्री, तरुणाचा आज ( 2 ऑक्टोबर) सोमवारी सकाळी मृतदेह सापडला. अक्षय ज्योतीराम पवार (वय 26), गौरी चव्हाण (वय 23, दोघेही रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. त्यांनी कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले, याबाबतीत माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांकडे तपास सुरु केला आहे.
प्रेमीयुगुलाचे मृतदेह शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला शोधण्यात यश
दरम्यान, प्रेमीयुगुलाचे मृतदेह शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला शोधण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय आणि गौरी या दोघांनी रविवारी तलावात उडी मारून आत्महत्या केली. यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने दाखल झाले. यानंतर शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे जवानही तेथे पोहोचल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. रविवारी रात्री उशिरा गौरीचा मृतदेह हाती लागला. त्यानंत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.
नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या अस्पष्ट
आज (2 ऑक्टोबर) सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी अक्षयचाही मृतदेह सापडला. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही.
तलावाजवळ आले अन् काही क्षणात उडी मारली
कोंडवे येथील काही शेतकरी गुरे चारत असतानाच रविवारी तलावाच्या ठिकाणी गौरी व अक्षय आले. थोडा वेळ थांबल्यानंतर त्या दोघांनी तलावात थेट उडी घेतली. तलावात उडी घेतल्यानंतर डोंगरावर गुरे चालणाऱ्यांपैकी एकाने पाहिले. त्यांनी पळत जाऊन पाहिले तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाल होते.
मोरीमध्ये जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune–Bengaluru Expressway) कराडच्या हद्दीत जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असून त्यासाठी मोरी बांधण्याचे काम सुरु आहे. मृतदेह जळत असल्याचे सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दुर्गंधीसह मृतदेह जळत असल्याचे समोर आले. नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या शेजारी चप्पल असल्याने संबंधित मृतदेह पुरुषाचे असल्याचा कयास आहे. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या