Satara Phaltan Doctor Case: फलटण डाॅक्टर युवती प्रकरण; पीएसआय गोपाळ बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीत काय समोर आलं?
Satara Phaltan Doctor Case: पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचे व घरमालकाचा मुलाग प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे युवतीने नमूद केले होते.

Satara Phaltan Doctor Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदनेला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी बदनेच्या शोधासाठी पथके स्थापन केली होती. मात्र, स्वतः हून शनिवारी रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. पोलिसांनी शरण येताच रात्री दीड वाजेपर्यंत त्याची कसून चौकशी करत रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
'पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केला'
आत्महत्या केलेल्या युवती डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पीएसआय गोपाल बदनेनं चार वेळा बलात्कार केल्याचे व घरमालकाचा मुलाग प्रशांत बनकरने गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. युवतीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवत शनिवारी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक केली होती. मात्र, पीएसआय बदने हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी सातारा पोलिसांनी बीड, पुणे आणि पंढरपूरकडे पथके रवाना केली होती. फलटणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये डाॅक्टर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तपासात पीएसआय बदने रडला
दरम्यान, पोलिस स्टेशनला स्वत:हून हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी बदने रडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शरण आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यापूर्वी मध्यरात्रीपर्यंत चौकशी केली होती. तत्पूर्वी, त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेल्यानंतर आपला पोलिसांवर विश्वास असल्याचे त्याने म्हटले होते. दुसरीकडे, युवतीच्या सुसाईड नोटवरून घरमालकाचा मुलगा प्रशांत आणि बदनेला अटक केली असली तरी महिलेत नोकरीत सुद्धा रिपोर्ट बदलून देण्यासाठी राजकारण्यांचा आणि पोलिसांचा दबाव होता, असेही तिच्या व्हायरल झालेल्या पत्रांवरून समोर आलं आहे. यामध्ये खासदार आणि त्यांच्या दोन पीएचा सुद्धा उल्लेख आहे.
युवतीच्या व्हायरल चौकशी जबाबात जवळपास डझनभर पोलिस आणि वैद्यकीय क्षेत्रातील डाॅक्टरांची नावे आहेत. तसेच खासदार आणि दोन पीए यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे युवतीच्या हातावरील नोटकडे न जाता नोकरीत छळ होऊनही त्याकडे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, त्याकडे पाहावे अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























