Satara Crime : साताऱ्यात इलेक्ट्रिक मशिन चोरणारी टोळी तडीपार; सातारा पोलिसांची कारवाई
Satara Crime : इलेक्ट्रिक मशीनची चोरी करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. पाच जणांची ही टोळी होती.
सातारा : इलेक्ट्रिक मशीनची चोरी करणाऱ्या टोळीवर सातारा पोलिसांनी तडीपारची कारवाई केली आहे. पाच जणांची ही टोळी होती. आप्पा रघुनाथ सातपुते (रा. पेरले, ता. कराड), सद्दाम शब्बीर शेख (रा. काशीळ, ता. सातारा), गणेश बाळासाहेब कांबळे (रा. पेरले, ता. कराड), गणेश महेंद्र चव्हाण (रा. पेरले, ता. कराड), अभय जनार्दन चव्हाण (रा. पेरले, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.
एक महिन्यांपूर्वी दोन टोळ्या सातारा जिल्ह्यातून तडीपार
दरम्यान, एक महिन्यांपूर्वी दोन टोळ्या सातारा जिल्ह्यातून (Satara Crime) तडीपार करण्यात आल्या होत्या. कोरेगाव तालुक्यात दुखापत करणे, दहशत माजवणे असे गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्या तडीपार करण्यात आल्या आहेत. सातारा पोलिस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी तडीपारची कारवाई केली आहे. यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. सर्व आरोपी कोरेगाव तालुक्यातील आहेत. अथर्व अजय पवार (वय 19 रा. कोरेगाव) तौफिक शेख (वय 20), नीरज तानाजी बोडरे (वय 19, दोघे रा. केदारेश्वर रोड केदारेश्वर रोड, ता. कोरेगाव) अशी एका टोळीतील आरोपींची नावे आहेत. या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केले होते. दुसरी टोळीही कोरेगाव तालुक्यातील आहे. युवराज भरत जगदाळे (वय 22), अथर्व सुशांत जगदाळे (वय 21, रा. दोघेही कुमठे, ता. कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत. जातीय तेढ निर्माण करण्यासह अनेक गंभीर गुन्हे या टोळीवर आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सुधारणा होत नसल्याने तडीपारची कारवाई करण्यात आली. कोरेगाव पोलिसांनी प्रस्ताव तयार करून पोलिसांना पाठवला होता.
फलटणमध्ये दिवसाढवळ्या व्यापाऱ्याला कोयता, तलवारीच्या धाकाने लुटले
दुसरीकडे, (Satara Crime) फलटण शहरात रविवारी (ता. 24 सप्टेंबर) दिवसाढवळ्या व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करत कोयता आणि तलवारीने लुटल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात व्यापारी जखमी झाला आहे. अरिंजय दोशी (वय 72) असे त्यांचे नाव आहे. फलटण शहरात मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोर ही घटना घडली. हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्ला उचलून नेला. हल्लेखोरांनी अनेक दुकांनामध्ये धाक दाखवून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांध्ये दहशत निर्माण झाली आहे. हल्लेखोरांना व्यापारी अरिंजय दोशी यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो चुकवला.
इतर महत्वाच्या बातम्या