Sangli News : धर्मांतरच्या निषेधार्थ आज आटपाडी शहर बंद; आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा, भोंदूगिरीने उपचारासह धर्मांतराचा आरोप
Sangli News : गेळे कुटुंबाने केलेल्या धर्मांतर प्रकारच्या निषेधार्थ आज आटपाडी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरातील आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णावर जादूटोणा भोंदूगिरीने उपचारासह धर्मांतराचा आरोप असलेला संजय गेळे व अश्विनी गेळे या पती-पत्नीवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेळे कुटुंबाने केलेल्या धर्मातर प्रकारच्या निषेधार्थ आज आटपाडी शहर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. आटपाडीमधील बाजारपेठ बंद असल्यामुळे पेठेत शुकशुकाट जाणवला. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. जादूटोणा करणारे आणि लोकांचं धर्मांतर करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आटपाडी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी हे आंदोलन केले आहे. (Strict shutdown in Atpadi to protest conversion sangli)
काय आहे प्रकरण?
आटपाडीमध्ये (Sangli News ) मागील 4 दिवसापासून धर्मातर जादूटोणा अंधश्रद्धा आदी विषयावरून खळबळ माजली आहे. येथील संजय गेळे व त्याची पत्नी अश्विनी गेळे यांनी आपल्या अंगी दिव्य शक्ती असल्याचे भासवून जादूटोणा करून पेशंट बरा करण्याच्या उद्देशाने वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती दिली. तसेच आयसीयूमध्ये विनापरवानगी प्रवेश केला.
सोनाली शिवदास जिरे (वय 18, रा. मापटेमळा आटपाडी) हिच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले. जादूटोणा, भोंदूगिरी केल्याची फिर्याद संपतराव नामदेव धनवडे यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. परंतु, धर्मांतराचा विषय गंभीर असून त्या अनुषंगाने कारवाई करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. दवाखान्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आटपाडीमध्ये लोकभावना तीव्र होत विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन देत भोंदूगिरी, अंधश्रध्दा पसरवत धर्मातराचे रॅकेट गेळे कुटुंब चालवत असून त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या धर्मांतर प्रकरणाचा निषेध म्हणून आज आटपाडी बंदचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, गेळेच्या कृत्यास डॉ. आदित्य यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुजत घालत असल्याचे व्हिडिओत दिसून येते. सदर व्हिडिओतून हा प्रकार धर्म परिवर्तन व अंधश्रद्धा भोंदूगिरीचा दिसून आला आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकरणे अनेक दिवसांपासून आटपाडी आणि परिसरात होत असल्याची विविध माध्यमांद्वारे समजत आहेत. बेकायदेशीररि अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या गेळे दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संपतराव धनवडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या