Sangli Crime : आटपाडीत 'आयसीयू'मध्ये रुग्णाच्या डोक्यावर हात फिरवून भोंदूगिरी; पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल
आटपाडी शहरातील वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून भोंदूगिरी करण्याचा प्रकार घडला होता. आटपाडी पोलिसांनी भोंदूगिरी करणाऱ्या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Sangli Crime : सांगली जिल्ह्यात आटपाडी शहरातील वरद हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून भोंदूगिरी करण्याचा प्रकार घडला होता. आटपाडी पोलिसांनी या प्रकरणात आता भोंदूगिरी करणाऱ्या पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात जादूटोणा केल्याचा आरोप करत संपतराव नामदेव धनवडे यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी संजय गोळे आणि त्याची पत्नी अश्विनी गोळे यांनी (दोघेही रा. आटपाडी, जि. सांगली) अंगी दिव्यशक्त असल्याचे भासवून तसेच जादूटोणा करण्याच्या उद्देशाने वरद हाॅस्पिटलमधील अतिदतक्षता विभागात रुग्णाचे नातेवाईक असल्याचे सांगून घुसले होते. यानंतर त्यांनी रुग्णाच्या डोक्यावर हात फिरवत टॅबमधील मजकूर वाचून दाखवला होता. तसेच बोटाने शस्त्रक्रिया करत असल्याचे भासवून भोंदूगिरी करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, धनवडे यांनी आपल्या तक्रारीत आटपाडी गावात बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम जाणून-बुजून सुरू असल्याचे म्हटले होते. 21 डिसेंबर रोजी वरद हॉस्पिटल आटपाडी येथील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. सदर व्हिडिओत वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील दाखल झालेल्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी तंत्र मंत्राच्या आधारे भोंदूगिरी करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Sangli News)
या कृत्यास डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता त्यांच्याशी संबंधित व्यक्ती हुजत घालत असल्याचे दिसून येते. सदर व्हिडिओतून हा प्रकार धर्म परिवर्तन व अंधश्रद्धा भोंदूगिरीचा दिसून आला आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकरणे अनेक दिवसांपासून आटपाडी आणि परिसरात होत असल्याची विविध माध्यमाद्वारे समजत आहेत. बेकायदेशीररि अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या गेळे दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संपतराव धनवडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या