सांगलीकरांना पक्षीसंग्रहालयाची प्रतीक्षा! पहिल्या टप्प्यातलं 60% काम होत आलं, उर्वरित कामासाठी किती कोटींचा निधी?
उद्यानात अत्याधुनिक पक्षी संग्रहालय उभारण्यात येणारं आहे. प्रतापसिंह उद्यानाचे 2.16 कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालयमध्ये रूपांतरन करण्याचा प्रयत्न आहे.

Sangli: सांगली महापालिका मुख्यालयाजवळील प्रतापसिंह उद्यान कधीकाळी सिंहांच्या डरकाळीने दणादणून जात होते. गेल्या पंधरा वर्षात या उद्यानाला अवकळा आली आहे. ही अवकळा दूर करून आता या उद्यानात पक्षी संग्रहालय उभारण्याचे प्रयत्न चालू आहेत.सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यानात महापालिकेच्यावतीने पक्षी संग्रहालय (Bird Century) उभारण्यत येणार आहे. उद्यानात अत्याधुनिक पक्षी संग्रहालय उभारण्यात येणारं आहे. प्रतापसिंह उद्यानाचे 2.16 कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालयमध्ये रूपांतरन करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात 1.16 कोटी रुपये मंजूर झाले होते. पक्षीसंग्रहालयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांसाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पक्षीसंग्रहालयाच्या उर्वरित कामांसाठी 60 लाख रुपये आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद केली आहे. (Sangli News)
पक्षीसंग्रहालयाची सांगलीकरांना प्रतीक्षा
या नवीन उद्यानात पक्षमित्र व तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रत्येक जातीच्या पक्ष्यांसाठी वेगवेगळे पिंजरे तयार करण्याविषयी चर्चा झाली. संग्रहालयासाठी पक्षिमित्रांची एक तज्ज्ञ समितीही गठित केली जाणार आहे. या पक्षी संग्रहालयामध्ये बंदिस्त पिंजऱ्यामध्ये कोणते पक्षी ठेवता येतील, याबाबत वन विभागाकडून कायदेशीर मार्गदर्शन घेतले जाईल.प्रतापसिंह उद्यान बंद झाल्यापासून सांगलीत उद्यानाचा विकास झाला नाही. यामुळे आता प्राणी संग्रहालय जरी शक्य नसले तरी किमान पक्षी संग्रहालय लवकरात लवकर उभारले जावे अशी ग्रामस्थामधून मागणी वाढत आहे.
पक्षीखरेदी अन् उर्वरित कामांसाठी 100 कोटींची तरतूद
पक्षीसंग्रहालयाच्या उर्वरित कामांसाठी 60 लाख रुपये आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 1.16 कोटींमधून प्रस्तावित केलेली कामे सुरू आहेत. पक्षांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड काँक्रिट, शेड, पाथ वे स्टॅम्प काँक्रिट, पक्षांची घरटी, पाणी, खाद्य साठवायचे भांडार, पक्षांची माहिती देणारे फलक, लॉन, बगिचा आदी कामांचा समावेश आहे. त्यातील 60 टक्के काम झाले आहे. गटार, शेडचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पक्षीसंग्रहालयाच्या उर्वरित कामांसाठी 60 लाख रुपये आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच सांगलीकरांसाठी हे पक्षीसंग्रहालय खुले होईल.
काय सुविधा? किती काम झाले?
नवीन पक्षी संग्रहालयासाठी नियोजित सोयीसुविधा:
पक्ष्यांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित पिंजरे
पक्ष्यांची घरटी आणि खाद्य साठवण्यासाठी विशेष व्यवस्था
आधुनिक पाथवे, गटार आणि लॉन
पर्यटकांसाठी माहितीफलक आणि सोयीसुविधा
पहिल्या टप्प्यातील 60% काम पूर्ण
गटार, शेड, पिंजरे आणि लॉनचे काम अंतिम टप्प्यात
उर्वरित कामे आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाखांचा निधी मंजूर
हेही वाचा



















