![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli : स्वतःच्याच दुकानात चोरी केल्यामुळे मालकाला अटक; इन्शुरन्सच्या पैशासाठी रचला बनाव
Sangli Crime : सांगलीत स्पोर्ट्सचे दुकान तोट्यात सुरू असल्याने इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी दुकानमालकानेच केला चोरीचा बनाव..स्वतःच्याच दुकानात चोरी करणाऱ्यासह दोघांना अटक
![Sangli : स्वतःच्याच दुकानात चोरी केल्यामुळे मालकाला अटक; इन्शुरन्सच्या पैशासाठी रचला बनाव sangli vishrambag sports shooes owner arrested for stealing own shop for insurance money marathi news update Sangli : स्वतःच्याच दुकानात चोरी केल्यामुळे मालकाला अटक; इन्शुरन्सच्या पैशासाठी रचला बनाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/14/18e2c8ce0b1722359302fed9103bd4d0169729820937593_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली: स्वतःच्याच दुकानात चोरी केल्यामुळे स्पोर्ट्स शूज दुकानाच्या मालकाला आज पोलिसांनी अटक केली. दुकान तोट्यात आल्यानंतर इन्शुरन्सच्या पैशासाठी मालकाने हा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मालक आणि त्याच्या साथिदाराला अटक केली आहे.
विश्रामबागमधील एका स्पोर्ट्स वस्तू विक्रीच्या दुकानात दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. दुकानमालकाकडून दुकानात चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली होती. मात्र या चोरीच्या घटनेत एक ट्विस्ट आला आहे. तो म्हणजे सदर दुकानाच्या मालकाने स्पोर्ट्सचे दुकान तोट्यात सुरू असल्याने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच दुकानातील स्पोर्ट्स शूजची चोरी केल्याचे पोलीस तपासात समोर आलं.
दुकानातील स्पोर्ट्स शूजची चोरी केल्याप्रकरणी दुकानमालकासह चोरीच्या वेळी मदत केलेल्या अशा दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सगळ्या तपासात बाबी समोर आल्याने या चोरीच्या गुन्ह्यात फिर्यादीच आरोपी झाला आहे. आकाश प्रकाश सूर्यवंशी याचे विश्रामबाग येथे स्पोर्ट्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. त्याला आणि त्याचा साथीदार अक्षय संजय बोगारे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत
आकाश प्रकाश सूर्यवंशी याचे विश्रामबाग येथे स्पोर्ट्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. तर अक्षय संजय बोगारे असे दुसऱ्या साथीदाराचे नावे आहे. सूर्यवंशीने 4 आक्टोबर ते 6 आक्टोबर दरम्यान हे दुकान फोडून अज्ञातांनी महागडे स्पोर्ट्स शूज लंपास केल्याची विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली होती. या चोरीचा तपास सुरू असताना एलसीबी पथकातील विक्रम खोत यांना ही चोरी दुकान मालक असलेल्या सूर्यवंशी यानेच इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पथक त्यांचा शोध घेत असताना शंभर फुटी रस्ता परिसरात दोघेजण दुचाकीवर एक पोते घेऊन संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये स्पोर्ट्स शूज आढळून आले. त्याबाबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी दुकान तोट्यात सुरू असल्याने इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी सूर्यवंशी याने बोगारे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदय माळी, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)