एक्स्प्लोर

Eknath Khadse : गिरीश महाजन साध्या शिक्षकाचा मुलगा, आज हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊन बसला; एकनाथ खडसेंचा थेट आरोप 

जळगाव नव्हे तर संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे, त्या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. 

जळगाव: माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे एवढा मी आर्थिक दुर्बल नाही, माझं डोकं ठिकाणावर नसतं तर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना उत्तर देण्याची वेळ आली नसती असा टोला राष्ट्रवादीचे आमदार गिरीश महाजन (Eknath Khadse) यांनी लगावला.  गिरीश महाजन हा एका साध्या शिक्षकाचा मुलगा, आज हजारो कोटींची प्रॉपर्टी घेऊन बसला असंही ते म्हणाले. राज्यात शेकडो लोक मरताहेत, त्याची जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या, नुसते एकनाथ खडसेवर टोलवा टोलवी करून चालणार नाही अशी टीका त्यांनी केली. 

नांदेडची जी मोठी दुर्घटना घडली ते खाते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्या घटनेला ते स्वतः जबाबदार असल्याचा आरोप मी केला होता. जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय सेवा ही कोलमडलेली आहे. सरकारने वेळेस लक्ष दिले नाही तर नांदेड सारखीच घटना जळगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही अशी भीती एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यात डेंगूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असताना दुसरीकडे मात्र आपल्या जळगाव जिल्ह्यातले मंत्री हे विदेशात फिरत आहे, तिकडे मौज मजा करत आहे. जळगाव जिल्ह्यात यायला त्यांना वेळ कुठे आहे असे म्हणत जपान दौरा करणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला.

सदावर्ते यांची विश्वासार्हता काय? 

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाला उचकवण्याचा काम करत असल्याचा गंभीर आरोप आजच्या सभेत केला. त्यामुळे जरांगे पाटील खरं बोलत आहेत की सदावर्ते खरं बोलतात हे तपासावं लागेल. मात्र काहीतरी तथ्य असेल म्हणूनच जरांगे पाटील यांनी अशा गंभीर स्वरूपाचे वक्तव्य केला आहे. सदावर्ते यांची विश्वासार्हता तपासावी लागेल. हिंसक घटना घडतील असं सदावर्ते जर म्हणत असतील तर ते सदावर्ते यांनाच माहीत, त्यांना अशी माहिती कुठून मिळाली? 

सरकारमधले आदरणीय संकट मोचक गिरीश महाजन हे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल संकटमोचन करण्यासाठी गेले होते, त्यामुळे सरकार दरबारी हा प्रश्न येऊन सुद्धा आतापर्यंत सुटलेला नाही असा टोलाही एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना लगावला. 

उदयनराजे यांनी पहिला निवृत्त व्हावं

खासदार उदयनराजे यांच्या वक्तव्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षे असतं. त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व राजकारण्यांचा निवृत्तीचा निर्णय शासनाने घ्यावा. उदयनराजे हे सरकारमध्ये असल्यामुळे त्यांनी 60 वर्षानंतरच्या सर्वांना राजकारणातून निवृत्त करण्याच्या निर्णयाबाबत सरकारकडे आग्रह धरावा. त्यांच्या विनंतीला सरकार नक्की मान देईल अशी अपेक्षा आहे. उदयनराजे यांचं स्वतःचं वय हे साठ वर्षापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांनीही राजकारणातून आधी निवृत्त व्हावे.

माझ्यावर आरोप करण्यात विरोधकांना असूरी आनंद

भोसरी प्रकरण असेल किंवा दाऊदच्या बायकोशी माझे संबंध असल्याचा आरोप असो, असे अनेक आरोप माझ्यावर झाले. मात्र कुठल्याही आरोपात तथ्य आढळलं नाही असं सांगत एकनाथ खडसे म्हणाले की, मला अटक करण्याच्या बातम्या पसरवला जात होत्या. या बातम्यांमधून असूरी आनंद विरोधकांना होत होता. मात्र या बातम्या मी मनोरंजन म्हणून पाहिलं, कारण मला न्यायदेवतेवर विश्वास होता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Aaditya Thackeray Viral Video: तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊतJalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखलMumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणारNitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Aaditya Thackeray Viral Video: तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Cidco Homes : सिडकोच्या 26000 घरांसाठी पसंतीक्रम कधीपासून नोंदवायचा? बुकिंग शुल्क कधी भरायचं? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेबाबत मोठी अपडेट, पसंतीक्रम कधीपासून नोंदवता येणार? जाणून घ्या
Embed widget